शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सप्तश्रृंगगडावर उद्या छबिन्याची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 14:55 IST

वणी : कोजागरी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी तृतीय पंथीयांचे सप्तशृंगगडावर आगमन झाले असुन रविवारी छबिन्याची मिरवणुक हे प्रमुख आकर्षण असणार आहे.

वणी : कोजागरी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी तृतीय पंथीयांचे सप्तशृंगगडावर आगमन झाले असुन रविवारी छबिन्याची मिरवणुक हे प्रमुख आकर्षण असणार आहे. रविवारी गडावर कोजागिरी पौर्णिमेचा होत असतो. कावडधारक दर्शनार्थी भाविक व तृतीयपंथीय देवीभक्त यांच्या उपस्थितीत साजरा होणारा सोहळा पाहण्यासाठी देशभरातील भाविक हजेरी लावतात.या सर्व उत्सव मालिकेत प्रमुख आकर्षण असते ते तृतीयपंथीयांच्या छबिन्याचे. पौर्णिमेला शिवालय तलावात तृतीयपंथी स्नान करतात. नविन वस्त्र परिधान करु न विविध प्रकारचे दागदागीने घालतात, सुवर्णलंकारांचे सुशोभिकरण करतात. कुलदेवता देवींच्या मुर्ती गुरुंच्या फोटोचे पुजन, पुजाविधी मंत्रोच्चाराच्या साथीने करण्यात येतात. दरम्यान काही भाविक नवसपुर्तीसाठी समुहात सहभागी होतात. नवसपुर्तीसाठी भाविकांना शिवालय तलावात स्नान करावे लागते.त्यानंतर त्या भाविकांना जमिनीवर झोपविण्यात येते. कडुनिंबाच्या पानांचा प्रतिकात्मक वापर करु न पुजाविधी करण्यात येतो व नवसाच्या स्वरु पाचा उल्लेख करु न कुलदेवीला व देवताना साकडे घालण्यात येते. नवसपुर्ती झाल्यानंतर पुढील वर्षी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द घेण्यात येतो दरम्यान दुपारच्या सुमारास कुलदेवीचा फोटो चांदीची मुर्ती सुशोभित छबिन्यात ठेवण्यात येते. काही तृतीयपंथी सुशाभित टोपलीत गुरु ंचा फोटो देवीच्या मुर्ती ठेवतात. गडावरील सर्व भागातुन छबिन्याची मिरवणुक पहिल्या पायरीपर्यंत नेण्यात येते. त्यापुर्वी ठिकठिकाणी तृतीयपंथी नृत्य करतात. काही भाविकही यात सामील होतात. ही मिरवणुक पहिल्या पायरीपर्यंत पोहचल्यानंतर कुलदेवी व सप्तशृंगी देवीची भेट होते. निंब नेसवणे पुजाविधी पार पाडल्यानंतर सप्तशृंगीचे दर्शन करण्यात येते. परतल्यानंतर मान्यता व परंपरेनुसार विधी पार पाडण्यात येऊन दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास सुरु होतो. विशेष म्हणजे वर्षातुन एकदाच हा छबिना गुरु आज्ञेनुसार बाहेर काढण्यात येतो व नंतर गुरूंंच्या आदेशानुसार निश्चित ठिकाणी ठेवण्यात येतो.

टॅग्स :Nashikनाशिक