शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दर्शन वानखेडे यांचासलग बारा तास अध्यापनाचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:44 IST

१२ तास, १२ विषय, १२ इयत्ता, १२ अध्यापनतंत्र, १२ शिक्षणपद्धती आणि या विद्यार्थ्यांना सलग १२ तास अविरतपणे केलेले अध्यापन असा विक्रम येथील शिक्षक दर्शन वानखेडे यांनी केला आहे. बुधवारी (दि.२०) सकाळी ७ वाजता पेठरोडवरील उन्नती उच्च माध्यमिक विद्यालयात या विक्रमास प्रारंभ झाला.

नाशिक : १२ तास, १२ विषय, १२ इयत्ता, १२ अध्यापनतंत्र, १२ शिक्षणपद्धती आणि या विद्यार्थ्यांना सलग १२ तास अविरतपणे केलेले अध्यापन असा विक्रम येथील शिक्षक दर्शन वानखेडे यांनी केला आहे. बुधवारी (दि.२०) सकाळी ७ वाजता पेठरोडवरील उन्नती उच्च माध्यमिक विद्यालयात या विक्रमास प्रारंभ झाला. सायंकाळी ७ वाजेपर्यंत त्यांनी तितक्याच उत्स्फूर्तपणे अध्यापनाचे काम केले. या विक्रमाची जागतिक वंडर बुक आॅफ लंडन आणि जिनियस बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली. दर्शन वानखेडे हे ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक असून, शिक्षण क्षेत्रात काहीतरी वेगळे भरीव काम करावे, विद्यार्थी व शिक्षकांची क्षमता जगाला समजावी या उद्देशाने हा उपक्रम केल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांना शिक्षण विस्तार अधिकारी सुनीता राठोड, विजयालक्ष्मी मणेरीकर, अशोक श्रावण, अ‍ॅड. प्रवीण अमृतकर, नंदलाल धांडे, मुख्याध्यापक कल्पना शिरोडे, अशोक सोंजे यांचे मार्गदर्शन लाभले. याआधी त्यांनी सलग ६४ तास श्लोक पठणाचा विश्वविक्रम केला होता.  वानखेडे यांनी शिक्षण अध्यापन पदविका पूर्ण केली असून, इतिहास विषयात पदवी संपादन केली आहे. तसेच ते सध्या बीएड करत आहेत. सहा वर्षांपूर्वी अध्यापन क्षेत्रात पदार्पण केलेल्या वानखेडे यांनी ‘एक मिसळ बारा पाव’ हे शिक्षक व विद्यार्थी यांच्या जीवनावर आधारित बालनाट्य लिहिले आहे.  त्यांनी शिक्षणक्षेत्रात वेगळे कार्य करण्याचे स्वप्न पाहिले असून, ते आयुष्यभर या स्वप्नाची परिपूर्ती करत राहणार आहे. हा विक्रम या प्रवासाचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. ...म्हणून उन्नती विद्यालय दर्शन वानखेडे हे शिक्षक असलेली ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूल ही शाळा केवळ १ ली ते १० वी पर्यंतच असल्याने तेथे हा विक्रम करणे शक्य नव्हते. त्यामुळे १ली ते १२ वीचे वर्ग असणाºया उन्नती उच्च माध्यमिक विद्यालयाची निवड करण्यात आली. जागतिक विक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी शाळेला मिळत असल्याने उन्नती एज्युकेशन संस्थेच्या या शाळेतील सर्व वर्गांच्या विद्यार्थी, शिक्षकांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

टॅग्स :NashikनाशिकTeacherशिक्षक