शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

विंदा यांच्या साहित्य निर्मितीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:39 IST

विंदा करंदीकर यांच्या विचारांचा प्रखर वेग आणि शब्दांचे सामर्थ्याच्या अनुभूतीसोबतच त्यांचे ललित लेखन, नाटक, बालकविता, अनुवाद यांची अनोखी पर्वणी नाशिककर रसिकांना अनुभवायला मिळाली.

नाशिक : विंदा करंदीकर यांच्या विचारांचा प्रखर वेग आणि शब्दांचे सामर्थ्याच्या अनुभूतीसोबतच त्यांचे ललित लेखन, नाटक, बालकविता, अनुवाद यांची अनोखी पर्वणी नाशिककर रसिकांना अनुभवायला मिळाली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सावरकरनगरमधील नाशिक विभागीय केंद्रातर्फे ठाकूर रेसिडेन्सी येथील सभागृहात शनिवारी (दि.२४) यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला कवी विंदा करंदीकर यांच्या समग्र साहित्य निर्मितीचे ‘स्वच्छंद’ कार्यक्रमातून सादरीकरण करण्यात आले. यावेळी ‘माझ्या मना बन दगड’सारखी अस्तित्वाला भिडण्याची जाणीव करून देणाऱ्या कवितेसोबतच ‘फाउस्ट’ अनुवादित नाटकातील उतारा मंत्रमुग्ध करून गेला. विंदांच्या लेखनातील नाट्यमयता, चित्रमयता यांचे अनोखे दर्शन वामन पंडित, अनिल फराकटे, प्रसाद घाणेकर, विद्यागौरी ताह्मनकर, माधव गावकर या कलाकारांनी रसिकांना घडवले. कार्यक्रमाची संहिता डॉ. विद्याधर करंदीकर, तर निर्मिती संकल्पना व नेपथ्य वामन पंडित यांचे होते. माधव गावकर यांच्या संगीताने कार्यक्रमात रंगत भरली. प्रास्ताविक विश्वास ठाकूर यांनी केले. यावेळी निवृत्ती अरिंगळे, कवी किशोर पाठक, अरविंद ओढेकर, डी. जे. हंसवाणी, डॉ. फय्याज रघुनाथ फडणीस, कवी लक्ष्मण महाडिक, डॉ. प्राचार्य लीना पांढरे, डॉ. विवेक खरे यांच्यासह साहित्यरसिक उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिकuniversityविद्यापीठ