शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात पेट्रोल ८७, तर डिझेल ७४ रुपये ; चार वर्षातील विक्रमी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 17:59 IST

गेल्यावर्षी केंद्र सरकारने गेल्या १६ जून २०१७ पासून डायनॅमिक फ्यूल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिमची सुरु वात केल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीत रोजच्या रोज होणाºया बदलांमुळे इंधनाच्या दरात हळूहळू वाढ होऊन पेट्रोलचे दर जवळपास १२ रुपयांनी वाढून ८७.०१, तर डिझेल तब्बल १५ रुपयांनी महागल्याने ७४.८७ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात गेल्या चार वर्षांत झालेली ही विक्रमी वाढ असून, या दरवाढीविरोधात नाशिककरांनी संताप व्यक्त करीत पेट्रोलियम पदार्थांनाही जीएसटी अंतर्गत आणण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देनाशकात पेट्रोल,डिझेलची विक्रमी दरवाढइंधन दरवाढीने नागरिकांचे कंबरडे मोडणारसोशल मिडियतून सरकारवर टिकेची झोड

नाशिक : गेल्यावर्षी केंद्र सरकारने गेल्या १६ जून २०१७ पासून डायनॅमिक फ्यूल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिमची सुरु वात केल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीत रोजच्या रोज होणाºया बदलांमुळे इंधनाच्या दरात हळूहळू वाढ होऊन पेट्रोलचे दर जवळपास १२ रुपयांनी वाढून ८७.०१, तर डिझेल तब्बल १५ रुपयांनी महागल्याने ७४.८७ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात गेल्या चार वर्षांत झालेली ही विक्रमी वाढ असून, या दरवाढीविरोधात नाशिककरांनी संताप व्यक्त करीत पेट्रोलियम पदार्थांनाही जीएसटी अंतर्गत आणण्याची मागणी केली आहे.नाशिक शहरासह राज्य व देशभरात वर्षभरापूूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत थोडी जरी वाढ झाली तरी, सर्वत्र गोंधळ होत असल्याचे पहायला मिळत होते. परंतु, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून शहरात इंधनाच्या किमतीत रोजच्या बदलामुळे नियमितपणे हळूहळू वाढ होत असताना महागाईही संथगतीने वाढत आहे. केंद्र सरकारने गेल्या १६ जून २०१७ पासून डायनॅमिक फ्यूल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिमची सुरु वात केली असून, तेव्हापासून नाशिकमध्ये पेट्रोलच्या दरात १२.२३ रु पये प्रतिलिटरने वाढ होऊन ते ८७.१ रुपये प्रतिलिटर एवढी विक्रमी वाढ झाली आहे, तर डिझेलच्या किमतीत १५.९५ रुपयांनी वाढ झाली असून, ते ७४.८७ रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. इंधनाच्या किमती अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने अन्य जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतूक व पुरवठ्याचा खर्चही वाढला असल्याने महागाईत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये संतापाचे वातावरण असून, शहरवासीयांकडून पेट्रोलियम पदार्थांवर जीएसटी लावण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान,पेट्रोल व डिझेलच्या किमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने दरवाढीच्या प्रमाणात रिक्षा व टॅक्षीसारख्या प्रवासी वाहनांना टेरीफ वाढवून मिळण्याची मागणी विविध संघटनांकडून जोर धरू लागली आहे. 

सोशल मिडियातून टिकेची झोडचार वर्षांतील उच्चांकी दर तेल कंपन्या रोजच्या रोजच तेलाच्या किमतीत वाढ करत आहेत. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किमतीनी गेल्या चार वर्षांतील उच्चांक गाठला असून, सोशल मीडियातूनही पेट्रोल व डिझेल दरवाढीला विरोध होऊ लागला आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढणाºया किमतीची आकडेवारी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक व टष्ट्वीटरच्या माध्यमातून शेअर करून सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहे.  

टॅग्स :Petrolपेट्रोलNashikनाशिकconsumerग्राहकInflationमहागाई