शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये धार्मिक स्थळे हटविण्याच्या विरोधात याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 18:56 IST

नाशिक : शहरातील बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्याच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि अन्य संस्थांनी अखेरीस मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी (दि. २४) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, महापालिकेला त्यासंदर्भात सोमवारी (दि. २७) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देसोमवारी सुनावणी महापालिकेला हजर राहाण्याचे आदेश

नाशिक : शहरातील बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्याच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि अन्य संस्थांनी अखेरीस मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी (दि. २४) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, महापालिकेला त्यासंदर्भात सोमवारी (दि. २७) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शहरातील बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटविण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार वर्गवारी करण्यात आली आहे. त्यात २००९ पूर्वी आणि २००९ नंतर अशी विगतवारी करण्यात आली आहे. त्यातील दुसऱ्या टप्प्यातील धार्मिक स्थळे बहुतांशी सोसायट्यांच्या खुल्या जागेत असून, अशी ७१ धार्मिक स्थळे हटविण्याचे नियोजन आहे. ती वाचविण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या माध्यमातून पुढाकार घेऊन उच्च न्यायालयात शुक्रवारी (दि. २४) याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार विनोद थोरात, प्रवीण जाधव, पंडित देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. धार्मिक स्थळे हटविण्याच्या विरोधात उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर शासन आदेशान्वये पद्धती विहित करण्यात आली होती. त्या आधारे मंदिर समिती गठित करून हरकती आणि सूचना मागविणे आणि त्यानंतर सुनावणी घेऊन रहदारीला अडथळा होईल अशी धार्मिक स्थळे निश्चित करण्याची गरज होती; परंतु विहित पद्धतीचे पालन केले गेले नाही. त्याचप्रमाणे रहदारीला अडथळा होणाºया किंवा न होणाºया या स्थळांबाबत फेरसर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे दुर्गावाहिनीच्या अ‍ॅड. मीनल वाघ यांनी सांगितले.

यासंदर्भात उच्च न्यायालयाने महापालिकेला बाजू मांडण्यासाठी सोमवारी (दि. २७) हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. नवीन चोमल हे काम बघत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकHigh Courtउच्च न्यायालय