शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पेठ तालुका पुन्हा कोरोनामुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:38 IST

नाशिक : तब्बल दोन महिन्यांच्या काळानंतर जिल्ह्यातील पेठ तालुका पुन्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना पेठ तालुक्यातील रुग्णसंख्या शून्यावर आल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही काहीसा दिलासा मिळू शकला आहे.

ठळक मुद्देदिलासा : जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १६ हजार ३८० रुग्ण झाले बरे

नाशिक : तब्बल दोन महिन्यांच्या काळानंतर जिल्ह्यातील पेठ तालुका पुन्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना पेठ तालुक्यातील रुग्णसंख्या शून्यावर आल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही काहीसा दिलासा मिळू शकला आहे.जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ३८० कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्य:स्थितीत १ हजार ९८३ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत २ हजार ९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या पेठमध्ये शून्यावर तर सुरगाण्यात अवघी ४ आहे. नाशिक ग्रामीणच्या अन्य तालुक्यांमध्ये नाशिक ५३, चांदवड ११, सिन्नर ४८, दिंडोरी ३९, निफाड ८५, देवळा १६, नांदगाव ५६, येवला १३, त्र्यंबकेश्वर १६, कळवण १८, बागलाण २७, इगतपुरी १६, मालेगाव ग्रामीण ४१ असे एकूण ४४३ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ३६७, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात १५८ तर जिल्ह्याबाहेरील १५ असे एकूण १ हजार ९८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख २० हजार ४५३ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ९६.४० टक्के, नाशिक शहरात ९६.९६ टक्के, मालेगावमध्ये ९३.२० टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.३४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.६२ इतके आहे. नाशिक ग्रामीण ८२४ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ३५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७६ व जिल्ह्याबाहेरील ५५ अशा एकूण २ हजार ९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यातील १८ सेंटर पुन्हा कार्यान्वितजिल्ह्यातील पेठ कोरोनामुक्त झाले असले तरी ग्रामीणच्या अन्य तालुक्यांमध्येदेखील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य विभागातर्फे खबरदारीची उपाययोजना म्हणून ग्रामीण भागातील १८ कोविड सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व कार्यरत असलेल्या केंद्रांमधील कोविड चाचण्यांची संख्यादेखील वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRural Developmentग्रामीण विकास