तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सहकार्याने नवनवीन कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून यावर्षी सगूना राईस टेक्निक व चार सूत्री पद्धतीने लागवड केली असून, यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल, असा विश्वास कृषीतज्ज्ञ व कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पारंपरिक शेती प्रकारातून आदिवासी भागातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाकडे घेऊन जाण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने बांधावरील शेतीशाळा हा उपक्रम घेण्यात आला. जुलै महिन्यात झालेल्या पावसात पेठ तालुक्यातील शेती व पिकांचे फारसे नुकसान झाले नसल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे.
तौक्ते वादळ नुकसान भरपाई
मार्च, एप्रिल महिन्यात झालेल्या आंबा फळ पीक नुकसानाचे पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवण्यात आला होता. यामध्ये जवळपास ३५० हेक्टर आंबा फळ पीकधारकांना नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त झाली असून, संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी सांगितले.
इन्फो...
पीक विम्याबाबत शेतकरी उदासीन
मागील वर्षी पेठ तालुक्यातील जवळपास १५ हजार शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा काढला होता; मात्र नवीन हंगाम सुरू होऊनही अद्याप विमा कंपनीकडून नुकसान भरपाईची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या पदरी पडलेली नाही. पंचनामा झालेल्यांपैकी ९१६७ शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असून, प्रत्यक्ष लाभ केव्हा मिळेल, याची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनाला कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने विमाधारकांची संख्या साधारण पाच हजारावर येऊन ठेपली आहे.
इन्फो...
चारसूत्री भात लागवड प्रकल्प
पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून चारसूत्री भात व नागली लागवड हा प्रकल्प पेठ तालुक्यात राबवण्यात येत आहे. पिंपळवटी येथे चार सूत्री पद्धतीने नागली पिकाची लागवड प्रकल्प राबवण्यात आला असून, कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी नवीन तंत्रज्ञानाचे विशेष मार्गदर्शन करून हा प्रकल्प सुरू केला आहे. या अंतर्गत जवळपास १०० हेक्टर लागवडीचा लक्षांक निर्धारित करण्यात आला आहे.
इन्फो...
खरीप पीक आराखडा
एकूण क्षेत्र -२७४४९ हेक्टर
भात लागवड क्षेत्र -९४६२ हेक्टर
नागली लागवड क्षेत्र - ७१२४ हेक्टर
एकूण महसुली गावे -१४५
कृषी मंडळ - २
फोटो - २१ पेठ राईस
पेठ तालुक्यात चार सूत्री पद्धतीने भात लागवड करताना शेतकरी.
290721\29nsk_6_29072021_13.jpg
पेठ तालुक्यात चार सुत्री पध्दतीने भात लागवड करतांना शेतकरी.