शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पेठला सागाची तस्करी रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 01:09 IST

पेठ परिक्षेत्रांतर्गत वनामधून सागाच्या झाडांची कत्तल करत सुमारे २९ सागाचे नग (१.१२९ घनमीटर) अवैधरीत्या तस्करांकडून वाहून नेले जात असताना वनविभागाच्या पथकाने सापळा रचून वाहन ताब्यात घेतले. दरम्यान, अंधाराचा व जंगलाचा फायदा घेत संशयित तस्कर पळून जाण्यास यशस्वी ठरले.

ठळक मुद्दे२९ नग जप्त : घडकाम करून दडविला अवैध साठा

नाशिक : पेठ परिक्षेत्रांतर्गत वनामधून सागाच्या झाडांची कत्तल करत सुमारे २९ सागाचे नग (१.१२९ घनमीटर) अवैधरीत्या तस्करांकडून वाहून नेले जात असताना वनविभागाच्या पथकाने सापळा रचून वाहन ताब्यात घेतले. दरम्यान, अंधाराचा व जंगलाचा फायदा घेत संशयित तस्कर पळून जाण्यास यशस्वी ठरले.पेठ तालुक्यातील मौजे बारदा गावात वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा मुसळे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रादेशिक गस्ती पथकासह पेठ फिरते दक्षता पथकाच्या सहाय्याने दोन सापळे रचले. या गावाच्या शिवारात वनक्षेत्राच्या परिसरात ठिकठिकाणी छापा मारून झाडाझडती घेतली असताना दडवून ठेवलेला सागाचा माल आढळून आला. यामध्ये तासणी वगैरेच्या माध्यमातून घडकाम केलेले सागाचे २९ नग वनविभागाच्या पथकाने जप्त केले. या कारवाईत वनपाल, वनरक्षकांसह वनमजुरांनी सहभाग घेतला. तस्करीच्या उद्देशाने अवैधरीत्या दडविलेला सागाचा हा साठा सुमारे ३८ हजार ९८८ रुपये किमतीचा असल्याचे मुसळे यांनी सांगितले. जप्त केलेल्या सागाच्या नगांपैकी कुठल्याही नगावर स्वामित्व खून नसल्याचे पंचनाम्यात आढळून आले आहे. स्थानिक तस्क रखोरांनी वनक्षेत्रात जाऊन काही दिवसांपूर्वी चोरटी तूट करत सागाच्या लाकडांचे घडकाम केले असल्याचा संशय तपासी पथकाने व्यक्त केला आहे. भारतीय वनअधिनियम १९२७च्या कलम ५२(१)नुसार अज्ञात तस्करखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपास मुसळे करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागSmugglingतस्करी