पेठ बसस्थानक समस्यांचे आगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:03 PM2018-07-18T23:03:34+5:302018-07-18T23:06:45+5:30

पेठ : येथील बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून, परिवहन महामंडळाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी पेठ तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

Peth Bus Station Crisis Issues | पेठ बसस्थानक समस्यांचे आगर

पेठ बसस्थानक समस्यांचे आगर

Next
ठळक मुद्देखड्डे, गळक्या बस : उपाययोजनांची मागणी

पेठ : येथील बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून, परिवहन महामंडळाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी पेठ तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
तालुक्यात एकमेव असलेल्या बसस्थानकातून महाराष्ट्रासह गुजरात राज्यातही परिवहन सेवा पुरवली जाते. बलसाड ते नाशिकदरम्यानच्या १५० किमी प्रवासात पेठ हे एकच बसस्थानक आहे. मात्र या आवारात पावसाळ्यात तलावाचे स्वरूप प्राप्त होते. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच खड्ड्याने स्वागत करण्यात येते.
परिसरात सर्वत्र खड्डे असल्याने बसस्थानक परिसरात प्रवाशांना कसरत करत मार्गक्र मण करावे लागते. पेठ आगाराच्या बसेस म्हणजे भरवशाच्या म्हशीला टोणगा अशी गत झाली आहे. बसस्थानकातून सुटलेली बस इप्सित गावाला पोहचेलच असे नाही. कोणत्याही रस्त्याला गेलात तर एक तरी बस नादुरुस्त अवस्थेत हमखास आढळून येते. त्यात पावसाळ्यात तर बसच्या आत आणि बाहेर पाण्याचाच अनुभव येतो. बसेसला लागलेली गळती, तुटलेले बाकडे आणि फाटलेले कुशन यामुळे गाड्यांचीही पुरती वाट लागलेली आहे. अशा
धोकेदायक बसेसमधून प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.राष्ट्रवादी कॉँग्रेसचे निवेदनपेठ आगारातील असुविधांबाबत पेठ तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस आक्र मक झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या उपस्थितीत तहसीलदार हरिष भामरे यांना निवेदन देण्यात आले. परिवहन महामंडळाने चांगल्या स्थितीत बसेस पुरवठा न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याप्रसंगी तालुकाध्यक्ष दामू राऊत, युवक अध्यक्ष गिरीश गावित, नगरसेवक गणेश गावित, तुळसा फोद्दार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Peth Bus Station Crisis Issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.