शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

सासरच्यांकडून छळ; विवाहितेची तक्रार

By admin | Updated: December 4, 2015 22:50 IST

सासरच्यांकडून छळ; विवाहितेची तक्रार

सटाणा : तालुक्यातील द्याने येथील नवविवाहितेचा सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळाबरोबरच सासऱ्याकडून विनयभंग झाल्याची तक्रार जायखेडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.बागलाण तालुक्यातील खमताणे हे तिचे माहेर आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात द्याने येथील हिंमत कापडणीस याच्याशी तिचा विवाह झाला. विवाहानंतर काही दिवसातच तुला स्वयंपाक येत नाही, काम येत नाही म्हणून मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. मात्र हा छळ सहन करत विवाहिता नांदत होती. परंतु २ नोव्हेंबर रोजी सासरे मुरलीधर यांनी आपली बायको व मुलगी घरात नसल्याचा फायदा घेऊन घरात काम करत असलेल्या सुनेचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. सुनेने नकार देत कसेबसे घरातून बाहेर येत घडलेला प्रकार आपली सासू मंगलाबाई व नणंद शारदा यांना सांगितला. मात्र घडलेला प्रकार कोणाला सांगू नको नाहीतर तुला मारून टाकू, अशी धमकी त्यांनी दिली. संध्याकाळी पती हिंमत घरी आल्यावर त्याला हा प्रकार सांगितला, तर पतीनेही या प्रकाराबाबत वाच्यता करू नको, असे सांगून मला शिवीगाळ केली. त्यांनतर दिवाळीसाठी माझा भाऊ मला घेण्यास आला असता सासरच्यांनी माहेरी जा; पण कोणाला काही सांगू नको अन्यथा तुला गच्चीवरून फेकून मारून टाकू अशी धमकी दिली. माहेरी आल्यानंतर मी माझ्या माहेरी घडलेला सर्व प्रकार सांगून आता नांदायला जाणार नाही, माझ्या जिवाला आणि इभ्रतीला धोका असल्याचे पीडित विवाहितेने तक्र ारीत नमूद केले आहे. या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात सासरे मुरलीधर कापडणीस, सासू मंगलाबाई कापडणीस, नणंद शारदा संतोष भदाणे, पती हिंमत कापडणीस या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)