नाशिक : स्थानिक उद्योजकांना प्रदर्शनासाठी कायमस्वरूपी जागा देण्याचा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. महापालिका हद्दीत ८२ एकर जागा देण्याचे महापालिका आणि नगरविकास खात्याने मान्य केले असून, आता काही महिन्यांत या जागेवर भूमिपूजन होऊ शकेल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.नाशिक इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन म्हणजेच निमाच्या वतीने त्र्यंबकरोडवर पीटीसीसमोरील मोकळ्या मैदानात निमा इंडेक्स २०१५ या प्रदर्शनाचे उद््घाटन शुक्रवारी देसाई यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिंदाल सॉ लि.चे अध्यक्ष दिनेशचंद्र सिन्हा आणि एचएएलचे महाव्यवस्थापक आर नारायणन् तसेच निमाचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार देवयानी फरांदे अणि सीमा हिरे यादेखील उद््घाटन सोहळ्यास उपस्थित होत्या.
स्थानिक उद्योजकांना प्रदर्शनासाठी कायमस्वरूपी जागा
By admin | Updated: April 25, 2015 01:51 IST