शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये क्रीडांगणे विकसित करण्यास ‘स्थायी’ची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 14:37 IST

समितीची बैठक : सव्वा तीन कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव

ठळक मुद्देप्रभाग क्रमांक १६ मध्ये आगरटाकळी शिवार आणि प्रभाग क्रमांक २३ मधील दोन क्रीडांगणे विकसित होणार शिखरेवाडी क्रीडांगणाची दुरुस्ती करण्यासही ४४ लाख ९९ हजार रुपयांच्या प्रस्तावास मान्यता

नाशिक - महापालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी (दि.१४) झालेल्या सभेत सुमारे क्रीडांगण विकासासाठी सुमारे सव्वा तीन कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. त्यामुळे प्रभाग क्रमांक १६ मध्ये आगरटाकळी शिवार आणि प्रभाग क्रमांक २३ मधील दोन क्रीडांगणे विकसित होणार आहेत.स्थायी समितीची साप्ताहिक सभा सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ३ कोटी २३ लाख रुपये खर्चाचे क्रीडांगणे विकसित करण्याचे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. त्यात, प्रभाग क्रमांक १६ मधील आगरटाकळी शिवारातील स.नं. २९ (पै) येथील मंजूर अभिन्यासातील खुल्या जागेत क्रीडांगण विकसित करणे, नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक २३ मधील स.नं. ८७१/१+२ येथील मंजूर अभिन्यासातील खुल्या जागेत तसेच प्रभाग क्रमांक २३ मधीलच स.नं. ८६९ (पै) येथील खुल्या जागेत क्रीडांगण विकसित करणे या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. याशिवाय, नाशिकरोड येथील प्रभाग क्रमांक २० मधील शिखरेवाडी क्रीडांगणाची दुरुस्ती करण्यासही ४४ लाख ९९ हजार रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. दरम्यान, पेस्टकंट्रोलच्या ठेकेदाराच्या चौकशी अहवालाचे काय झाले, असा सवाल सूर्यकांत लवटे यांनी उपस्थित केला आणि स्थायीवर सदर अहवाल सादर झाला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यावर, सभापती गांगुर्डे यांनी सदर चौकशी अहवाल मावळते आयुक्तांपुढे सादर करण्यात आला होता. परंतु, त्यांची बदली झाल्याने आता नवीन आयुक्त त्यावर निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. श्यामकुमार बडोदे यांनी खासगी जागांमध्ये उभ्या असलेल्या अनधिकृत शेड हटविण्याची मागणी केली तर प्रवीण तिदमे यांनी मलनि:स्सारणासाठी प्राप्त निधीतून ठराविक प्रभागातच कामे धरण्यात आल्याचा आरोप केला.एलईडीप्रश्नी आयुक्तांना भेटणारएलईडीबाबत नगरसेवकांनी त्यांच्या निधीतून दिलेले प्रस्ताव रोखून धरण्यात आल्याबद्दल सूर्यकांत लवटे यांनी जाब विचारला. शासनाच्या परिपत्रकात महापालिकांसंबंधी आदेशाचा उल्लेखच नसल्याचे लवटे यांनी सांगितले तर प्रवीण तिदमे यांनी १२ जानेवारी २०१८ नंतरच्या कामांबाबतचे आदेश असल्याने त्यापूर्वीच्या निविदा प्रक्रियेनुसार कामे करण्यास काहीच हरकत नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी एलईडीबाबत स्थायी समिती लवकरच आयुक्तांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका