शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘जनता कर्फ्यू’ सरकारची भूमिका नाही ; लॉकडाऊन अशक्यच, व्यापाऱ्यांनी निर्णय घ्यावा : भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 17:27 IST

पुन्हा लॉकडाऊन करणे अशक्य आहे. व्यापारी संघटना आपापल्या पातळीवर निर्णय घेऊ शकतात; मात्र जनता कर्फ्यू करणे याला सरकारचे समर्थन असू शकत नाही अशी ठाम भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली आहे.

ठळक मुद्देबैठकीनंतर व्यापाऱ्यांनी केली दुकानांची वेळ निश्चितसकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत दुकाने सुरू राहणार

नाशिक: शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करावा, अशी मागणी विविध व्यापारी संघटनांकडून केली जात असली तरी आता पुन्हा लॉकडाऊन करणे अशक्य आहे. व्यापारी संघटना आपापल्या पातळीवर निर्णय घेऊ शकतात; मात्र जनता कर्फ्यू करणे याला सरकारचे समर्थन असू शकत नाही अशी ठाम भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली. दुकाने बंद करण्यासाठी राजकीय दबाव आणणे आयोग्य असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.  कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता महाराष्ट्र चेंबरऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेच्या यांच्या नेतृत्वाखालील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्र्यांची भेट घेऊन लॉकडाऊनची मागणी केली. व्यापाऱ्यांनी सम-विषम तारखेचा नियम रद्द करून सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी दुकानांची वेळ करण्याचीदेखील मागणी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांशी थेट संपर्क करून याबाबत विचारणा केली असता पुण्यात सम-विषम तारखांचा निर्णय मागे घेण्यात आल्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे सम-विषमचा निर्णय मागे घेता येणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना सांगितले. दुकानांची वेळ आणि गर्दीवरील नियंत्रणासाठी व्यापाऱ्यांच्या संघटनांनी स्वत:हून निर्णय घ्यावेत, सरकार म्हणून कोणतीही घोेषणा केली जाणार नसल्यचा पुनरुच्चार पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला. दुकाने बंद करण्याबाबत कुणीही राजकारण करू नये, असेही ते म्हणाले. तसेच  शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून लॉकडाऊनची मागणी केली जात असल्याचे पालकमंत्र्यांना विचारले असता त्यांनी केंद्राच्या नियमांचे राज्य सरकार पालन करीत असल्याने लॉकडाऊन लागू करावा, असे वाटत असेल तर भाजप नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. दरम्यान, पालकमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांनी दुकानांची वेळ निश्चित केली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी वेळ दुकानांसाठी असणार असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळMarketबाजार