शहरं
Join us  
Trending Stories
1
आसाम ते मणिपूर पावसाचा प्रकोप! ४८ जणांचा मृत्यू, ६०० ठिकाणी भूस्खलन, १५०० गावांना फटका
2
"हे खूप घृणास्पद, मी आता सहन करू शकत नाही"; ट्रम्प यांच्या निर्णयावर इलॉन मस्क संतापले
3
काळाचा घाला! लग्नावरुन परतणाऱ्या व्हॅनवर सिमेंटने भरलेला ट्रक उलटला, ९ जणांचा मृत्यू
4
१२ वर्षांनी गुरु-रवि युती, ७ राशींची ३० दिवस चांदीच चांदी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-लाभ!
5
जगाला धमकी देता देता ट्रम्प यांनी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली, अमेरिकेबाबत आली वाईट बातमी
6
पाकिस्तानला पुन्हा एकदा दिसणार भारतीय हवाई दलाची ताकद! सरावासाठी नोटम जारी
7
अमेरिका-चीनचं भांडण भारताच्या उंबरठ्यापर्यंत; जपान-जर्मनीही त्रस्त, कंपन्यांना टाळं ठोकण्याची वेळ
8
हा व्यक्ती आमिर खानला काही मिनिटांमध्ये करू शकतो कंगाल, कोण आहे तो व्यक्ती?
9
Share Market Today: ३ दिवसांनंतर शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १२१ अंकांनी वधारला, या स्टॉक्समध्ये तेजी
10
Sana Yousaf : "फ्रेंडशिप, रिजेक्शन आणि मर्डर कनेक्शन"; पाकिस्तानी टिकटॉकर सना युसूफची का झाली हत्या?
11
घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट
12
"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?
13
कोण आहे देशातील सर्वात महागडं घर खरेदी करणारी महिला? ६३९ कोटी किंमत; ६४ कोटींची स्टँप ड्युटीच भरली
14
नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; AC न मिळाल्याने पत्नीला दिला ट्रिपल तलाक
15
आजचे राशीभविष्य: ०४ जून २०२५; जलाशया पासून दूर राहा, घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल
16
"१८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाले"; RCB च्या विजयावर मल्ल्या म्हणाला, "माझी इच्छा पूर्ण करणाऱ्या..."
17
Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना 'मामा' का म्हणतात? म्हणाले होते- "एकदा सिनेमाचं शूटिंग करताना..."
18
आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग या क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदांवर अनुभवी कर्मचाऱ्यांना मागणी
19
नवा नियम! आता मतदार झालात तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेत नसेल मतदानाचा हक्क!
20
महापूर, भूकंप, वादळापासून स्वत:चं घर वाचवायचंय? 'प्रॉपर्टी इन्शुरन्स' हाच सर्वोत्तम फॉर्म्युला

महापालिका रुग्णालयांतही पेन्टाव्हॅलंट लस मोफत

By admin | Updated: December 1, 2015 23:52 IST

शुभारंभ : आता सहा ऐवजी तीन इंजेक्शन

नाशिक : घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हिपॅटायटीस बी व हिमोफिलस, इन्फ्ल्युएन्झा बी या पाच आजारांपासून संरक्षण देणारी पेन्टाव्हॅलंट लस आता महापालिकेच्या रुग्णालयातही मोफत उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याचा शुभारंभ महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात करण्यात आला. यापूर्वी लहान बालकांना डिपीटी लस व हिपॅटायटीस बी लस यांचे प्रत्येकी तीन इंजेक्शन, असे एकूण सहा इंजेक्शन देण्यात येत होते. मात्र, आता पेन्टाव्हॅलंट लसीचे तीनच इंजेक्शन देण्यात येणार आहेत.राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सदर लस राज्यभर उपलब्ध करून देण्याचा शुभारंभ नुकताच केला. सदर लस ही खासगी दवाखान्यात १३०० ते १४०० रुपयांना उपलब्ध होते. मात्र, नाशिक महापालिकेच्या रुग्णालये व दवाखान्यांमध्ये सदर लस मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमात बालरोग तज्ज्ञ डॉ. स्नेहा वाघ यांनी सदर व्हॅक्सिनची माहिती दिली. या लसीचा लाभ घेण्याचे आवाहन महापौरांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर गुरुमित बग्गा, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, महिला व बालकल्याण सभापती वत्सला खैरे, पंचवटी प्रभाग सभापती सुनिता शिंदे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नगरसेवक विमल पाटील, अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन इंदिरागांधी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश गरुड यांनी केले.