नाशिक : प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत सेवानिवृत्त कर्मचार्यांना पेन्शन देण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी संबंधित अधिकार्यांना दिले आहेत़ त्यामुळे निवृत्त कर्मचार्यांना वेळेवर पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़याबाबत जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने बनकर यांना निवेदन देऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली होती़ संघटनेचे पदाधिकारी व जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांची बैठक घेऊन बनकर यांनी चर्चा केली होती़ यातील अडचणी लक्षात घेऊन त्यावर तोडगा काढत पेन्शन वेळेत देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना केल्या़ तसेच पेन्शन देण्यास उशीर झाल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला़ यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, गटविकास अधिकारी रवींद्र परदेशी, संघटनेचे अध्यक्ष माधवराव भणगे, वसंत डोंगरे, भास्कर देशपांडे, रमाकांत अलई, प्रकाश तांबट आदि उपस्थित होते़
निवृत्तांना मिळणार वेळेवर पेन्शन
By admin | Updated: May 31, 2014 00:20 IST