शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कचरा केल्यास दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:52 IST

सिन्नर : शहरात यापुढे घाण, कचरा करून अस्वच्छता करणे महागात पडणार आहे. घाण-कचरा करणाऱ्याविरोधात नगर परिषदेने दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देसिन्नर : स्वच्छ शहरासाठी नगर परिषदेने घेतला निर्णय

सिन्नर : शहरात यापुढे घाण, कचरा करून अस्वच्छता करणे महागात पडणार आहे. घाण-कचरा करणाऱ्याविरोधात नगर परिषदेने दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आपले शहर सुंदर, स्वच्छ राहण्यासाठी सिन्नरकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी केले आहे.घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अंतर्गत असणाºया तरतुदीनुसार घरातील ओला व सुका कचरा वर्गीकरण करूनच नगर परिषदेच्या घंटागाडीत टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. घरातून घंटागाडीत ओला व सुका कचरा वेगळा न दिल्यास पहिल्या चुकीसाठी ५० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यानंतरही ओला-सुका कचरा पुन्हा एकत्र दिल्यास त्यानंतरच्या प्रत्येकवेळी ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. रस्त्यावर घाण कचरा टाकल्यास १८० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. कुणी सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १५० रुपये दंड भरावा लागणार आहे. उघड्यावर लघुशंका करणेही आता महगात पडणार आहे. असे करण्याºयास २०० रुपये तर उघड्यावर शौचास बसणाºयाविरोधात ५०० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. अनेकदा लोकंघर, दुकानाचे बांधकाम करतात. त्यासाठी मुरूम, वाळू, विटा, सीमेंट यासारखे साहित्य वापरतात; मात्र अशा वस्तूंचा साठा स्वत:च्या खासगी जागेत न करता थेट रस्त्यावरच करतात. अनेक दिवस रस्त्यावर हे साहित्य पसरते. येणाºया जाणाऱ्यांना त्याचा त्रास होऊनही दुर्लक्ष केले जाते; मात्र यापुढे अशा पद्धतीने रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकल्यास साहित्याच्या प्रत्येक खेपेसाठी ४०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. मैला उघड्यावर टाकला तरी यापुढे ५०० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. आपले शहर स्वच्छ, सुंदर राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी दुर्वास यांनी केले आहे.प्लॅस्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणीराज्य शासनाने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. शहरातील व्यावसायिक, दुकानदारांसह सर्वसामान्यांनी प्लॅस्टिकचा वापर केल्यास त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे. प्लॅस्टिकपासून बनविल्या जाणाºया पिशव्या, प्लॅस्टिकपासून बनविण्यात येणाºया ताट, कप, प्लेट्स, ग्लास, वाटी, चमचे, फ्लेक्स, बॅनर्स, तोरण, ध्वज, प्लॅस्टिक सिट्स, सर्व प्रकारचे प्लॅस्टिक वेस्टण यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे दुकानदारांशी अशा प्रकारच्या वस्तूंची विक्री करू नये वा त्यांची साठवणूक करू नये. अशा वस्तू सापडल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक