शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सुविधा न पुरविणाऱ्या आश्रमशाळांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:03 IST

विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या वतीने चालविण्यात येणाºया आश्रमशाळांच्या मनमानी कारभारला आता चाप बसणार आहे. आश्रमशाळांमध्ये सोयीसुविधांबाबत त्रुटी आढळल्यास दहा हजार रुपये दंड प्रसंगी मान्यता रद्द करण्याची कारवाईदेखील केली जाणार आहे.

नाशिक : विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या वतीने चालविण्यात येणाºया आश्रमशाळांच्या मनमानी कारभारला आता चाप बसणार आहे. आश्रमशाळांमध्ये सोयीसुविधांबाबत त्रुटी आढळल्यास दहा हजार रुपये दंड प्रसंगी मान्यता रद्द करण्याची कारवाईदेखील केली जाणार आहे.  आश्रमशाळांमध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्यास संस्थाचालकांना दहा हजार रुपये दंड आणि या त्रुटींची पूर्तता एक महिन्याच्या आत केली नाही तर मान्यता रद्दचीदेखील कारवाई शकते, असे आदेश शासनाने काढले आहेत. सौम्य स्वरूपाच्या त्रुटीसाठी पाच हजार रुपये दंडाची तरतूददेखील करण्यात आली आहे.  शाळा मान्य प्रवेशित संख्येपेक्षा (५० टक्के) कमी प्रवेशित असणे, संस्थेच्या कार्यकारिणीला धर्मादाय आयुक्तांची मान्यता नसणे, आश्रमशाळा संहितेप्रमाणे कामकाज न चालणे, व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे होणारे मृत्यू, आत्महत्या, बलात्कार, लैंगिक अत्याचार, सर्पदंश, मारहाण, गैरवर्तणूक आणि इतर घटना, निवासी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे भोजन, अत्यावश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून न देणे, वसतिगृहातील उपाहारगृहाला अन्न व औषध विभागाचा परवाना नसणे, दोन गणवेशाऐवजी एकच गणवेश देणे, अपुरी निवासी व्यवस्था, अपुरे शौचालय, स्नानगृहांची व्यवस्था निकषाप्रमाणे नसणे, शाळेला, वसतिगृहाला पक्की संरक्षण भिंत नसणे, विद्यार्थ्यांची हजेरी ७५ टक्क्यांपेक्षा कमी आढळून येणे, आश्रमशाळा अधीक्षकांसाठी वसतिगृहात निवासस्थान उपलब्ध करून न देणे आदी प्रमुख बाबींचा गंभीर बाबींमध्ये समावेश करण्यात आला आहे. सौम्य स्वरूपाच्या सात बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. यात विद्यार्थ्यांना तेल, साबण, पाणी, मुलींना सॅनिटरी नॅपकीन न देणे, परिसर, स्वयंपाकगृह, खोल्या अस्वच्छ असणे, पाण्याची नियमित तपासणी न करणे, पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था नसणे, वसतिगृहात अग्निशमन व्यवस्था उपलब्ध नसणे, विद्युत यंत्रणा पुरेशी नसणे, विद्युत व्यवस्थेला पर्यायी व्यवस्थेचे जनरेटर सोय नसणे आदी बाबींचा सौम्य बाबींमध्ये समावेश करण्यात आला आहे.  अशाप्रकारच्या गंभीर व सौम्य स्वरूपाच्या त्रुटी सहायक आयुक्त व प्रादेशिक उपायुक्त यांच्या तपासणीत आढळून आल्यास संबंधित स्वयंसेवी संस्थेस नोटीस दिली जाणार आहे. त्यानंतर एक महिन्यानंतर परत तपासणी करून या त्रुटी पूर्तता झालेली आढळून आली नाही तर संस्थेला दंड आकारण्यात येणार आहे.गंभीर बाबी निदर्शनासमागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मोफत निवास व शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जाते. विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाचे सचिव जे. पी. गुप्ता यांनी या संदर्भात शासन परिपत्रक निर्गमित केले आहे. स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जाणाºया मान्यताप्राप्त विशेष मागास प्रवर्गातील आश्रमशाळांमधील तपासणी दरम्यान निदर्शनास आलेल्या गंभीर स्वरूपाच्या व सौम्य स्वरूपाच्या बाबींमध्ये आढळणाºया अनियमिततेसाठी या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाSchoolशाळाStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र