शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
3
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
5
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
6
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
7
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
8
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
9
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
10
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
11
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
12
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
13
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
14
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
15
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
16
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
17
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
18
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
19
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न वापरणाऱ्यांवर उगारला दंडाचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:53 IST

दिंडोरी : रस्त्यावर फिरताना मास्क न वापरणाऱ्या ६८ नागरीकांवर नगरपंचायतीने कारवाई करीत १४ हजार ३२० रुपये दंड वसुल केला. शहरात कोरोना विष्णू संसर्ग आटोक्यात रहावा, त्याचा फैलाव होऊ नये म्हणून नगरपंचायत प्रशासनाकडून शहरात नागरीकांनी मास्क वापरावा, फिजिकल डिस्टन्स पाळावे, वारंवार हात धुवावेत यासाठी सातत्याने प्रबोधन केले जात आहे.

ठळक मुद्देदिंडोरी : पोलिसांनी वसुल केला १४ हजार रुपयांचा दंड

दिंडोरी : रस्त्यावर फिरताना मास्क न वापरणाऱ्या ६८ नागरीकांवर नगरपंचायतीने कारवाई करीत १४ हजार ३२० रुपये दंड वसुल केला. शहरात कोरोना विष्णू संसर्ग आटोक्यात रहावा, त्याचा फैलाव होऊ नये म्हणून नगरपंचायत प्रशासनाकडून शहरात नागरीकांनी मास्क वापरावा, फिजिकल डिस्टन्स पाळावे, वारंवार हात धुवावेत यासाठी सातत्याने प्रबोधन केले जात आहे.घंटागाडीच्या माध्यमातून लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजना व सूचना देत आहे. तरीही शहरात कोरोना बाबत काही नागरिक बेफिकिरी दाखवत असल्याचे निदर्शनास येत असल्याने नगरपंचायत प्रशासनाने, महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तिक कार्यवाही करून भरारी पथकाद्वारे दंडात्मक कारवाईला सुरूवात केली आहे.सोमवारी (दि.२२) शहरातील ६८ नागरिकांवर मास्क न वापरल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच नागरिकांना मोफत मास्कचेही वाटप केले. पोलीस प्रशासनामार्फत कोरोना विषयक नियम न पाळणाऱ्या वाहनधारक व विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दिंडोरी शहरात आत्तापर्यन्त रुग्णसंख्या आटोक्यात आहे. नगरपंचायत प्रशासनाने दिंडोरीत सातत्याने गर्दी होऊ नये, मास्क वापरावे याबाबत प्रबोधन केले. ह्यमाझी वसुंधराह्ण अभियानांतर्गत पथनाट्याद्वारे स्वच्छता विषयक जनजागृती केली.दिंडीरी शहरात दिवसभर ध्वनीक्षेपकाद्वारे गाडी फिरवत नागरिकांचे प्रबोधन सुरू ठेवले आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले, तहसीलदार पंकज पवार, पोलीस उपनिरिक्षक कल्पेशकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी प्रशांत पोतदार, कर निरीक्षक प्रदीप मावलकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग धीरज भामरे, नगर अभियंता सुनील पाटील, ईश्वर दांडगव्हाळ, हर्षल बोरस्ते, अमोल मवाळ, राजेंद्र खिरकाडे, राजेंद्र गायकवाड, सचिन जाधव, दीपक सोळंकी इत्यादी नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी यांनी शहरात धडक मोहीम राबवत आहेत.मास्क न वापरणाऱ्या, दुकानांपुढे फिजिकल डिस्टन्स न पाळणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. नागरिक व व्यापाऱ्यांनी काळजी घेत मास्क वापरावे, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दी करू नये, शासनाच्या नियम सूचनांचे काटेकोर पालन करावे व कोरोना विरुद्धच्या लढाईत सहकार्य करावे.- नागेश येवले मुख्याधिकारी, नगरपंचायत, दिंडोरी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल