शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सबसिडीची रक्कमही किसान योजनेंतर्गत अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:42 IST

दोन हेक्टर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याच्या पंतप्रधान किसान योजनेंतर्गत पहिला हप्ता शनिवारी शेतकऱ्यांच्या नावावर जमा झाल्यानंतर पुन्हा परत घेण्यात आल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी कायम असताना आता गॅस कंपनीकडून घेतलेल्या घरगुती गॅस सिलिंडरची थेट बॅँक खात्यात जमा होणारा अनुदानित परताव्याची रक्कमदेखील पंतप्रधान किसान योजनेंतर्गत बॅँकांकडून अदा केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

नाशिक : दोन हेक्टर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याच्या पंतप्रधान किसान योजनेंतर्गत पहिला हप्ता शनिवारी शेतकऱ्यांच्या नावावर जमा झाल्यानंतर पुन्हा परत घेण्यात आल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी कायम असताना आता गॅस कंपनीकडून घेतलेल्या घरगुती गॅस सिलिंडरची थेट बॅँक खात्यात जमा होणारा अनुदानित परताव्याची रक्कमदेखील पंतप्रधान किसान योजनेंतर्गत बॅँकांकडून अदा केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ज्या ज्या ग्राहकांनी गॅस सिलिंडरची खरेदी केली, अशांना त्यांचा परतावा थेट बॅँकेत जमा झाल्याचे बॅँकेचे लघु संदेश आल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.यंदा दुष्काळी परिस्थितीशी देशभरातील शेतकरी सामना करीत असल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक शेतकºयाच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकºयाच्या नावे दोन हेक्टरपर्यंत लागवडी योग्य जमीन असणे आवश्यक असून, सरकारी सेवेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता पेन्शनर, सरकारी अधिकारी, अन्य कर्मचाºयांना याचा लाभ मात्र मिळणार नाही. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये थेट शेतकºयांच्या बॅँक खात्यात जमा करण्यात येत असल्याने त्यासाठी शेतकºयांची माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारी शेतकºयांच्या नावे दोन हजार रुपये बॅँकेत जमा करण्यात आले, या जमा झालेल्या रकमेबाबत शेतकºयांमध्ये एकीकडे आनंद व्यक्त केला जात असताना काही शेतकºयांच्या खात्यावरील पैसे परत काढून घेण्यात आले आहेत. त्याबाबत ठिकठिकाणाहून तक्रारी येत असून, काहींनी पैसे न मिळाल्याबद्दल तक्रारीही केल्या आहेत. असे असताना गॅस सिलिंडरची बॅँकेत जमा होणारी अनुदानाची रक्कमदेखील आता बॅँकेत ‘पीएम-किसान’ या नावाने जमा होत असल्याचे लघु संदेश गॅसग्राहकांना बॅँकेकडून पाठविले जात आहे.हिंदुस्थान पेट्रोलियमकडून एका गॅसग्राहकाला त्याच्या कॅस मेमो क्रमांक १११५१२८ वर १५५ रुपये ९५ पैसे बॅँकेत जमा केल्याचा संदेश दोन दिवसांपूर्वी भ्रमणध्वनीवर आला असताना, ग्राहकाच्या नावे बॅँकेत जमा झालेले १५५ रुपये मात्र ‘पीएम-किसान’ या नावाने जमा झाल्याचे दाखविण्यात आले. गॅस सिलिंडरची अनुदानाची रक्कम किसान योजनेच्या नावे जमा करण्याच्या शासनाच्या या प्रकारामुळे गॅसग्राहकामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार