शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना कंपनीकडून धनादेश अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 16:34 IST

विंचूर : येथील शिवसाई एक्स्पोर्ट फर्म कंपनीच्या कंत्राटदाराने चार महिन्यांपासून शेतकर्‍यांचे रखडलेले शेतमालाचे पेमेंट न दिल्याने अखेर कंपनी मालकाने शेतकर्‍यांना कंपनीत बोलावून धनादेशाद्वारे १३ लाखांचे पेमेंट अदा केले. त्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कंपनी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे.

ठळक मुद्देविंचूर : शिवसाई कंपनी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करणार

विंचूर : येथील शिवसाई एक्स्पोर्ट फर्म कंपनीच्या कंत्राटदाराने चार महिन्यांपासून शेतकर्‍यांचे रखडलेले शेतमालाचे पेमेंट न दिल्याने अखेर कंपनी मालकाने शेतकर्‍यांना कंपनीत बोलावून धनादेशाद्वारे १३ लाखांचे पेमेंट अदा केले. त्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कंपनी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे.शिवसाई एक्सपोर्ट कंपनीने शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराला वेळेत पेमेंट दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याप्रकरणी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांत अधिकारी व लासलगाव पोलीस ठाणे येथे कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कंपनीचे मालक, व्यवस्थापक व शेतकऱ्यांना बोलावून बैठक घेत दाखल झालेल्या तक्रारीबाबत आढावा घेतला. यावेळी शिवसाई एक्सपोर्ट कंपनीचे मालक संभा शिवाराव, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश चौधरी, सनदी लेखापाल शिवदास आव्हाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.कंत्राटदाराने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे पैसे न देता फसवणूक केली आहे. याबाबत कंपनीच्या वतीने कंत्राटदाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असून, कंपनी शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे आठ दिवसांच्या आत देईल, असे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तसेच आजवर चार वर्षात कंपनीने २४० कोटी रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांना दिला असून, कंत्राटदाराने शेतकऱ्यांची १३ लाख रुपयांची फसवणूक केली. यातून कंपनीला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन कंपनीने नेमलेल्या कंत्राटदाराकडून शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. त्या कंत्राटदारावर कंपनीकडून कारवाई करण्यात येणार असून, त्याच्याकडून शेतकऱ्यांच्या पैशांची वसुली करण्यात येणार आहे. शिवसाई एक्सपोर्टकडून शेतकऱ्यांचा २० तारखेपर्यंत मोबदला देण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कंपनी मालक व व्यवस्थापक यांनी शेतकर्‍यांना दिनांक १९ रोजी कंपनीत बोलावून त्यांच्या शेतमालाचे पैसे धनादेशाद्वारे अदा केले. कंपनीने यापुढे अशी वेळ येणार नसून, शेतकर्‍यांची कुठलीही फसवणूक होणार नाही तसेच कंत्राटदाराऐवजी कंपनीचे प्रतिनिधी नेमणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी निफाड, चांदवड, येवला, कोपरगाव तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार