दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना गाळप केलेल्या उसाची एफआरपी २१८८ रुपये अदा केली असल्याची माहिती अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली.दुष्काळी परिस्थितीमुळे उसाची उपलब्धता कमी होती. कादवाने ७९ दिवसात १,१९,६४४ मे. टन उसाचे गाळप केले असून १०.५८ सरासरी साखर उतारा मिळत सुमारे १,२६,००० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा ऊस उत्पादकांना एफआरपी देणे अडचणीचे होते. शासनाने मागील संचालक मंडळ कार्यकाळ १९९५-९६ पासून थकीत ऊस खरेदी कर भरण्याची सक्ती करत कारखान्याची आर्थिक कोंडी केली. सदर खरेदी करापोटी कारखान्याला सुमारे तीन साडेतीन कोटी एकरकमी भरावे लागल्याने आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. एफआरपी रक्कम २३ फेब्रुवारी रोजी ऊस उत्पादकांच्या बँक खातीअदा केली आहे. यंदापासून कारखान्याने कंपोस्ट खतप्रकल्प सुरु केला असून, सवलतीच्या दरात खत विक्री सुरू आहे. शेतकऱ्यांनी सुमारे ५७ लाख ऊस रोपे पुरविली आहे. ऊस लागवड वाढावी यासाठी संचालक मंडळाने गावोगावी बैठका घेतल्या आहे. (वार्ताहर)
कादवाकडून रक्कम अदा
By admin | Updated: March 30, 2017 23:57 IST