कळवण - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या अधिपत्याखाली असलेल्या कळवण नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवकपदी विद्यार्थी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय अशोक पगार व कॉग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष मोय्योद्दीन शेख यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.स्वीकृत नगरसेवकपदाच्या दोन जागांसाठी काँग्रेसचे संजय अशोक पगार व मोय्योद्दीन नरोद्दीन शेख या दोघांचे निर्धारित वेळेत नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने केले. दोन जागांसाठी दोन नामनिर्देशनपत्र आल्याने बिनविरोध निवड झाल्याचे तहसीलदार कैलास चावडे यांनी बैठकीत घोषित केले.स्वीकृत नगरसेवक निवडीप्रसंगी सभागृहात माजी नगराध्यक्षा सौ सुनिता पगार , उपनगराध्यक्ष कौतिक पगार, बांधकाम सभापती जयेश पगार, आरोग्य सभापती अतुल पगार,नगरसेवक साहेबराव पगार, बाळासाहेब जाधव,सौ अनिता जैन ,सौ अनुराधा पगार,सौ भाग्यश्री पगार ,सौ रंजना पगार , सौ रंजना जगताप ,सौ रोहिणी महाले , सौ अनिता महाजन ,घनश्याम कोठावदे व नासीर शेख आदी उपस्थित होते. यावेळी पगार व शेख समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.-
कळवण नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवकपदी पगार व शेख बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:37 IST
कळवण - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या अधिपत्याखाली असलेल्या कळवण नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवकपदी विद्यार्थी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय अशोक पगार व कॉग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष मोय्योद्दीन शेख यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.
कळवण नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवकपदी पगार व शेख बिनविरोध
ठळक मुद्देकळवण नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक घनश्याम रामचंद्र कोठावदे व नासीर शेख यांनी स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने व राजीनामा मंजूर झाल्याने स्वीकृत नगरसेवक नामनिर्देशनासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कैलास चावडे व नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ सची