शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

किराणा किटपेक्षा आदिवासींना रक्कम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 00:18 IST

खावटी योजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या किटसंदर्भात आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी दिली. 

ठळक मुद्देमागणी : गैरव्यवहारासंदर्भात बुधवारी बैठक

नाशिक : खावटी योजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या किटसंदर्भात आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी दिली. दरम्यान, या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका निकाली काढण्यात आली आहे. तर किराणा किट देण्यापेक्षा महाडीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करावेत, अशी मागणी आमदार हिरामन खोसकर, नितीन पवार यांनी केली आहे. कोराेनाच्या लॉकडाऊनमुळे रोजगार गेलेल्या आदिवासी बांधवांना मदत करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्यावतीने खावटी योजनेचे पुनरुज्जीवन करून राज्यातील आदिवासी बांधवांना २ हजार रुपये रोख आणि २ हजार रुपयांचा किराणा अशी एकूण ४ हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे. २ हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहेत त्याचबरोबर किराणा किटचेही वाटप सुरू झाले आहे. मात्र किराणा किट खरेदी करताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप आमदार हिरामण खोसकर, नितीन पवार आदींनी केला आहे. याबाबत आदिवासी  विकासमंत्री ॲड. के.सी. पाडवी, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना पत्रही देण्यात आले आहे. या संदर्भात येत्या बुधवारी (दि. ३०) राज्यमंत्री तनपुरे यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचे आमदार खोसकर यांनी सांगितले. दरम्यान, किट निविदा प्रक्रियेसंदर्भात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. 

टॅग्स :NashikनाशिकMLAआमदारNarhari Jhariwalनरहरी झिरवाळ