शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांच्या सभेकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:29 IST

नाशिक : राज्यातील शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा घेऊन राष्टÑवादी कॉँग्रेसने राज्यस्तरीय हल्लाबोल यात्रा काढली.

ठळक मुद्देनेते, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा संदेश

नाशिक : राज्यातील शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा घेऊन राष्टÑवादी कॉँग्रेसने राज्यस्तरीय हल्लाबोल यात्रा काढली असून, उत्तर महाराष्टÑातील हल्लाबोल यात्रेच्या समारोपानिमित्त शनिवारी सायंकाळी ४ वाजता येथील गोल्फ क्लब मैदानावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड आदी राज्यस्तरीय नेते उपस्थित राहणार असून, त्यादृष्टीने जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून राष्टÑवादीचे स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. राष्टÑवादीच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या समारोप सभेनंतर तब्बल दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच येथील गोल्फ क्लब मैदानावर शरद पवार व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जाहीर सभा होत आहे़ वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीबरोबरच आगामी काळात सत्ताधाºयांशी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा संदेश कार्यकर्त्यांना या सभेतून दिला जाणार आहे. सुमारे दीड लाख नागरिक या सभेसाठी उपस्थित राहतील असा दावा केला जात असून, त्यासाठी ठिकठिकाणी बैठका, मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे; शिवाय शहरात फलक, झेंडे, बॅनर लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. राष्टÑवादी यानिमित्ताने उत्तर महाराष्टÑातील आपले बळ आजमावणार आहे. केंद्र व राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या जाहीर सभेत शरद पवार काय संबोधित करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असले तरी, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची सुरू असलेली तयारी, अलीकडेच झालेल्या पूर्वाेत्तर तीन राज्यांच्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांनी बजावलेली भूमिका, राष्टÑपुरुषांच्या पुतळ्यांची झालेली विटंबना, एनडीए सरकारमधून तेलगु देसमसारख्या पक्षाने घेतलेली फारकत या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांना सत्ताधाºयांच्या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्षाचा संदेश देण्याचा व त्याच निमित्ताने निवडणुकीची तयारी करण्याचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळी पक्षनेत्यांचे शहरात आगमन होणार असून, त्यानिमित्ताने शहरात राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार वातावरण निर्मिती केली आहे.दहा वर्षांनंतर गोल्फ क्लब दुमदुमणारराष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाच्या सन २००७ मध्ये नाशिक येथे राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप गोल्फ क्लब मैदानावरील सभेने झाला होता. तत्पूर्वी २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ कॉँग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी व शरद पवार यांची एकत्रित सभा या मैदानावर झाली होती. त्यानंतर तब्बल दहा वर्षांनंतर गोल्फ क्लब मैदानावर राष्टÑवादी कॉँग्रेस आपली ताकद आजमावत आहे. या मैदानावर यापूर्वी दिवंगत सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्याही सभा झाल्या आहेत.छगन भुजबळ यांच्यावरील अन्यायावर चर्चाराष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच होणाºया या जाहीर सभेत छगन भुजबळ यांच्यावर केल्या गेलेल्या सूडबुद्धीच्या कारवाईची चर्चा या जाहीर सभेतून होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भुजबळ यांच्यावरील न्यायालयीन प्रक्रियेस जाणूनबुजून लावला जाणारा विलंब, त्यांच्यावर उपचार करण्यास होणारी हलगर्जी या सर्व गोष्टींची जाहीर चर्चा राष्टÑवादी कार्यकर्ते करीत असून, भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकच्या भूमीत होणाºया या सभेत अन्यायावर चर्चा होणे अपेक्षित आहे.