शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात रुग्णाने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:24 IST

नाशिक : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी (दि.१२) एका २६ वर्षीय रुग्णाने संध्याकाळच्या सुमारास येथील पुरुष सामान्य कक्षातील स्वच्छतागृहात जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

ठळक मुद्देस्वच्छतागृहात जाऊन गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपविली.

नाशिक : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी (दि.१२) एका २६ वर्षीय रुग्णाने संध्याकाळच्या सुमारास येथील पुरुष सामान्य कक्षातील स्वच्छतागृहात जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.सिन्नर येथील मुसळगावमधील रहिवासी असलेला सचिन दादाजी सोनवणे (२६) हा जिल्हा शासकीय रुग्णालयात शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उपचारासाठी दाखल झाला होता. मद्यप्राशनाचे व्यसन असलेल्या या युवकाची शरीरयष्टी अत्यंत सडपातळ होती. त्याच्यावर उपचार सुरू होते; मात्र त्याने शनिवारी सायंकाळी येथील स्वच्छतागृहात जाऊन गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपविली. दरम्यान, दुसरा रुग्ण स्वच्छतागृहात जात असताना त्याचा हा प्रकार लक्षात आला. त्याने तत्काळ कक्षातील परिचारिकांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. घटनेची माहिती मिळताच निवासी वैद्यकीय अधिकारी, सिव्हील पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. सचिनच्या मृतदेह खाली उतरवून घेत पोलिसांनी पंचनामा केला यानंतर रात्री उशिरापर्यंत सरक ारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली जात होती. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. त्याने दिलेल्या नातेवाइकांच्या भ्रमणध्वनीक्रमांकावर रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून संपर्क साधला जात होता; मात्र कुठल्याहीप्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्याचे समजते. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस