शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-औरंगाबाद हायवेवरील खड्यांमुळे प्रवाशी झाले हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 19:00 IST

खेडलेझुंगे : नाशिक औरंगाबाद हायवेला बोकडदरे येथील म्हसोबा महाराज मंदिर ते धारणगांव खडक फाट्यापर्यंत मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे येथुन प्रवास करणे अत्यंत हालाखीचे झालेले आहे.

ठळक मुद्दे प्रवास करणे अत्यंत हालाखीचे झालेले आहे.

खेडलेझुंगे : नाशिक औरंगाबाद हायवेला बोकडदरे येथील म्हसोबा महाराज मंदिर ते धारणगांव खडक फाट्यापर्यंत मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे येथुन प्रवास करणे अत्यंत हालाखीचे झालेले आहे.सदर परिसरामध्ये अपघाती वळण व उंचवटा असल्याने रस्त्यावरील खड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन चालकांची तारंबळ उडते. सदरील खड्यांमधुन वाहने जंप घेतात. त्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच सततच्या पावसामुळे खड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. त्यामुळे वाहनांचे नुकसान सहन करावे लागत आहे.अपघाती वळण आणि खड्डे यामुळे प्रवाशांचे मोठे नुकसान होत आहे. बोकडदरे येथील टेकड्यावर असलेले हिरवी गर्द झाडे, अपघाती वळणे आणि त्यातच या परिसरातील रस्त्याची खड्डे पडुन रस्त्याची झालेली चाळण यामुळे प्रवाशी मेटाकुटीला आली आहे.वाहनांना वेग असल्याने खड्यातुन वाहने हेलकावे घेतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सदरील रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजविणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेवुन रस्त्यांवरील खड्डे बुजवावे अशी शेतकरी, प्रवाशी व वाहन चालकांकडुन मागणी होत आहे.मागील दुरु स्तीच्या वेळेस दुरु स्तीमध्ये खड्डे बुजविण्यासाठी मारलेले पॅचेसमुळे पुर्वीच्या खड्यांची साईज वाढलेली आहे. तसेचसख्याही वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामकाजावरच प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.मागील काही महिन्यांपुर्वी आचार संहीता असल्याने काम करता येत नाही म्हणुन सार्वजनिक बांधकाम विभागाने टिमकी वाजवित होती. परंतु आचार संहिता संपुन पंधारवाडा उलटुनही अद्याप पावेतो कामाला सुरवात केलेली नाही. त्यामुळे नाागरीकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.गावाची सुरवात होताच बेभान असलेल्या वाहनांच्या गतीवर नियंत्रण बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन नौताळे आणि म्हसोबा महाराज मंदिराजवळ तीन ठिकाणी अद्ययावत असलेले स्पीड ब्रेकर्स बसविण्यात आलेले होते. परंतु सदरचे स्पीड ब्रेकर्स हे निकामी ठरले. वाहनांच्या गतीमुळे सदरचे स्पीड ब्रेकर्स नष्ट झालेत. त्यामुळे सदरच्या ठिकाणची त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गTrafficवाहतूक कोंडी