शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर रेल्वेगाड्या होणार ‘एक्स्प्रेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 00:27 IST

रेल्वे प्रशासनाने दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वे गाड्या आता एक्स्प्रेस करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे रेल्वे प्रवासी भाड्यात वाढ होणार असली तरी प्रवाशांचा वेळदेखील वाचणार आहे. यामध्ये नाशिकशी संबंधित भुसावळ-मुंबई, देवळाली-भुसावळ या दोन गाड्यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देप्रवाशांची सुविधा : मुंबई-भुसावळ, देवळाली-भुसावळचा समावेश

नाशिकरोड : रेल्वे प्रशासनाने दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वे गाड्या आता एक्स्प्रेस करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे रेल्वे प्रवासी भाड्यात वाढ होणार असली तरी प्रवाशांचा वेळदेखील वाचणार आहे. यामध्ये नाशिकशी संबंधित भुसावळ-मुंबई, देवळाली-भुसावळ या दोन गाड्यांचा समावेश आहे.रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे पॅसेंजरच्या प्रवाशांना जादा भाडे मोजावे लागणार आहे. पॅसेंजरचे भाडे किमान दहा होते ते एक्स्प्रेस गाड्या झाल्यामुळे तीस रुपये होणार आहे. मात्र प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. रेल्वे प्रशासनाने देशातील विविध विभागांतील सुमारे पाचशे पॅसेंजर गाड्यांची यादीच जाहीर केली आहे. या निर्णयामुळे लॉकडाऊनमुळे झालेला तोटा भरून काढण्यास मोठी मदत होणार आहे. १९ जूनला याबाबत अंतिम अहवाल सर्व रेल्वे विभागांनी द्यायचा असून, तातडीने अंमलबजावणीही करायची असल्याची माहिती सूत्रांनी दिली.३३ रेल्वे गाड्यांची यादीमध्य रेल्वेच्या ३३ पॅसेंजर आता एक्स्प्रेस होणार आहेत. त्यामध्ये भुसावळ-मुंबई, देवळाली-भुसावळ, भुसावळ-इटारसी, भुसावळ-नागपूर, भुसावळ-वर्धा, भुसावळ-कटनी, पुणे-मनमाड, पुणे-कोल्हापूर, पुणे-निजामाबाद, मुंबई-परळी, मीरज-हुबळी, मुंबई-पंढरपूर, पंढरपूर-निजामाबाद आदींचा समावेश आहे.नाशिकशी संबंधित तीन पैकी दोन पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर होणार आहे. त्यामध्ये भुसावळ-मुंबई व देवळाली-भुसावळ या दोन गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांना नेहमी गर्दी असते. इगतपुरी-मनमाड पॅसेंजरमध्ये मात्र बदल करण्यात आलेला नाही.रेल्वे सेवा जेव्हा सुरळीत होईल, तेव्हा अंंमलबजावणी सुरू होईल.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे