शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

उर्दू पदविका परीक्षेत ४१ विद्यार्थी उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:40 IST

राज्याच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या उर्दू भाषेच्या पदविका अभ्यासक्रम परीक्षा नुकतीच ४१ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण केली, तर अरबी भाषेच्या परीक्षेत २६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. उर्दू पदविका परीक्षेत राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपआयुक्त सुनील कडासने हे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

ठळक मुद्देमनुष्यबळ विकास मंत्रालय : राज्य गुप्त वार्ता विभागाचे सुनील कडासने प्रथम

नाशिक : राज्याच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या उर्दू भाषेच्या पदविका अभ्यासक्रम परीक्षा नुकतीच ४१ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण केली, तर अरबी भाषेच्या परीक्षेत २६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. उर्दू पदविका परीक्षेत राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपआयुक्त सुनील कडासने हे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.प्रत्येक भाषा आणि तिचे वैशिष्ट्ये वेगवेगळी आहे. भाषा ही स्वतंत्र असते तिचा कुठल्याही जाती धर्माशी अथवा पंथाशी संबंध नसतो. तिचे आपले एक वेगळेच अस्तित्व असते. त्यामुळे कोणीही कोणत्याही भाषेच्या प्रेमात पडू शकतो. अलीकडे दुर्दैवाने भाषेलाही राजकारणात ओढले गेले आहे.सारडा सर्कलवरील नॅशनल उर्दू हायस्कूलला उर्दू भाषा पदविका अभ्यासक्रम केंद्राची मान्यता प्राप्त आहे. यावर्षी हा अभ्यासक्रम एकूण ९० विद्यार्थी शिकत होते.त्यापैकी ५३ विद्यार्थी हे इस्लाम धर्मीय नव्हते, अशी माहिती संस्थेचे सचिव जाहिद शेख यांनी दिली. त्यापैकी ४१ उमेदवारांनी उर्दू पदविका अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यामध्ये कडासने यांनी ८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला, तर स्वानंद राजपूत (७९ टक्के), अब्दूल रहेमान शेख (७८ टक्के) गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. अरेबिक पदविका परीक्षेत हमीदोद्दीन शेख यांनी ९५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच साजीद शेख, मुहम्मद अतिक यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला, अशी माहिती केंद्रप्रमुख लियाकत पठाण यांनी दिली. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्ष हाजी बबलू पठाण, सहसचिव एजाज काझी, प्राध्यापक जमीर पठाण, मौलाना युनूस खान आदी उपस्थित होते. नवीन वर्षासाठी प्रवेश सुरू झाले आहे.१४ वर्षांपासून पदविका अभ्यासक्रमनॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या आवारात चालविल्या जाणाºया या केंद्रात मागील १४ वर्षांपासून शेकडो विद्यार्थ्यांनी उर्दू, अरेबिक भाषेचे धडे गिरविले आहे. यामध्ये बिगर उर्दू भाषिकांचा समावेश अधिक आहे. केवळ उर्दू शिकली नाही तर ती बोलणे, लिहिण्याचेही ज्ञान उमेदवारांनी आत्मसात केले. अभ्यासक्रमासाठी लागणारी पाठ्यपुस्तके मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून मोफत पुरविली जातात. आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी उर्दू-अरेबिक भाषेचे ज्ञान घेतले आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण