शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाशा पटेल यांचा चांदवड तालुका दुष्काळी पाहणी दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 18:28 IST

चांदवड तालुक्याच्या मंगरुळ व भरवीर या दुष्काळी भागाची पहाणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी चांदवड तालुक्यातील मका, सोयाबीन, द्राक्ष, कांदा , टोमॅटो या पीकांची पहाणी केली

चांदवड- चांदवड तालुक्याच्या मंगरुळ व भरवीर या दुष्काळी भागाची पहाणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी चांदवड तालुक्यातील मका, सोयाबीन, द्राक्ष, कांदा , टोमॅटो या पीकांची पहाणी केली यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीन व मक्याच्या खरेदीसाठी शासनाने त्वरीत चांदवड तालुका दुष्काळी जाहीर करावा व शेतकºयांच्या हाताला काम द्यावे अशी मागणी केली . तर यावेळी चांदवड तालुका दुष्काळी जाहीर करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करुन मका व सोयाबीनच्या खरेदीबाबत संबधीतांशी बोलू असे आश्वासन पाशा पटेल यांनी शेतकºयांना दिले. चांदवड तालुक्यात पावसाने जवळपास दोन महिन्यापासून दडी मारल्याने हाताशी आलेली पिके जळुन खाक झाली.सुरुवातीला जेमतेम पावसावर शेतकºयांनी मका, सोयाबीन भुईमुग, कांदा , टोमॅटो झेंडू व इतर पिकाची लागवड केली. पावसाळ्याच्या सुरुवातीला जेमतेम पाऊस पडला. त्यामुळे शेतकºयांची बी.बीयाणे लावून मोठ्या प्रमाणात हायब्रीड पिकांची खरेदी करुन शंभर टक्के पेरणी केली.पिके ऐन भरत आल्यानंतर जवळपास दोन महिन्यापासून निसर्गाने दडी मारल्याने पिकामध्ये दाने न भरल्यामुळे जळुन खाक झाली.उधार उसनवारी व खाजगी व्यक्तीकडून उसनवारी करुन पैसे घेऊन व प्रसंगी दाग दागिणे गहाण ठेऊन शेतकºयांनी पिके उभी करण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च केला.परंतु शेतीमधुन एक रुपया देखील परत मिळेल अशी परिस्थिती राहीली नाही . शेतकºयांच्या विहीरी कोरड्या ठाक असून बोअरवेल देखील आटली आहेत. नदयाना व धरणामध्ये एक थेंब पाणी शिल्लक नाही. परतीचा पावसाळा देखील संपत आला.तरी पाऊस पडला नाही. याची खात्रीपटल्याने शेतकºयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कुंटूब चालविण्यासाठी पैसा नाही. पिण्यासाठी व जनावरांसाठी ही पाणी नाही. त्यामुळे पुढील काळ कसा घालवावा या विंवेचनेत शेतकरी सापडला आहे. चांदवड तालुक्यात कांदा हे पैशाचे नगदी पिक असून सुरुवातीच्या जेमतेम पावसावर लोकांनी आठ हजार रुपये एकराने कांदाची लागवड केली परंतु कांदा लावल्यानंतर कांद्याला पाणी देण्यासाठी विहीरी व बोअरवेल मध्ये थेंबभर पाणी नाही. त्यामुळे मोठ्या आशेने उभे केलेले कांद्याचे पीक जळून खाक होत आहे. याकडे त्वरीत लक्ष देऊ असे आश्वासन पाशा पटेल यांनी दिले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रdroughtदुष्काळ