शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नाशिकरोडला मिरवणुकीत ३५ चित्ररथांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:33 IST

नाशिकरोड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जय भीमच्या घोषणा देत फडकविण्यात येणारे निळे ध्वज व ढोलताशे, डीजेच्या गजरात हजारो आंबेडकर अनुयायांच्या उपस्थितीत नाशिकरोडला आंबेडकर जयंतीची मिरवणूक मोठ्या जल्लोषात व शांततेत पार पडली.

ठळक मुद्देशुक्रवारी मध्यरात्री आंबेडकरांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजनआंबेडकरांच्या जीवनावरील विविध ठिकाणी लावलेले फलक

नाशिकरोड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जय भीमच्या घोषणा देत फडकविण्यात येणारे निळे ध्वज व ढोलताशे, डीजेच्या गजरात हजारो आंबेडकर अनुयायांच्या उपस्थितीत नाशिकरोडला आंबेडकर जयंतीची मिरवणूक मोठ्या जल्लोषात व शांततेत पार पडली. मिरवणुकीत ३५ चित्ररथ सहभागी झाले होते. देवळालीगाव, विहितगाव, राजवाडा, सुभाषरोड, भाजीमार्केट, शिखरेवाडी, गंधर्वनगरी, नेहरूनगर, बिटको चौक, जयभवानीरोड, शिवाजी पुतळा, गोसावीवाडी, रेल्वेस्थानक, सिन्नर फाटा, स्टेशनवाडी, जेलरोड, भीमनगर, कॅनॉलरोड, पवारवाडी, शिवाजीनगर, छत्रपती चौक, दसक-पंचक आदी परिसरामध्ये विविध पक्ष, संघटना, मंडळे, संस्था आदींच्या वतीने उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर शुक्रवारी मध्यरात्री आंबेडकरांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. आकर्षक सजविलेले व्यासपीठ, आंबेडकरांच्या जीवनावरील विविध ठिकाणी लावलेले फलक, निळे झेंडे, विद्युतरोषणाई, भीमगीते, पोवाडे यामुळे सर्व परिसर आंबेडकरमय झाला होता. शनिवारी सकाळी आंबेडकर जयंतीला ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून विविध कार्यक्रम उत्साहात पार पाडले. युवक-युवती, महिला व आंबेडकर अनुयायी शनिवारी आपापल्या भागातून मोटारसायकलवर घोषणा देत, निळे झेंडे फडकवत मोटारसायकल रॅली काढली.मिरवणूक उत्साहातसायंकाळी आपापल्या भागातून निघालेले चित्ररथ बिटको चौकात मुख्य मिरवणुकीत सहभागी झाले. मिरवणुकीत सुभाषरोड तरुण मित्रमंडळ, व्हीआयपी फ्रेंड सर्कल, सामनगाव राजवाडा मित्रमंडळ, मिलन मित्रमंडळ, विश्वरत्न मित्रमंडळ, संघमित्र महिलामंडळ, हरिष भडांगे फ्रेंड सर्कल, सम्राट मित्रमंडळ, बाल्य फाउंडेशन, श्रमिकनगर फ्रेंड सर्कल, भारतभूषण सोशल फाउंडेशन, साहेब युवा सोशल फाउंडेशन, जेलरोड फाउंडेशन मित्रमंडळ, एपी साउंड अ‍ॅण्ड लाईट ग्रुप, जेबी बॉईज, सिद्धार्थ एकता मित्रमंडळ, धम्मरत्न तरुण मित्रमंडळ, सार्वजनिक सांस्कृतिक कला-क्रीडा मित्रमंडळ, चंद्रमणी मित्रमंडळ, राहुल मित्रमंडळ, आम्रपाली नगर मित्रमंडळ, भीमज्वाला मित्रमंडळ, निर्मिक सोशल फाउंडेशन, आम्रपाल कॅनॉलरोड मित्रमंडळ, उपनगर संयुक्त कला व क्रीडा मित्रमंडळ, पंचशिल बहुद्देशीय संस्था, महिला मित्रमंडळ, गौतमनगर फ्रेंड सर्कल, सिद्धार्थ सम्राट मित्रमंडळ, पीपल्स रिपब्लिकन पार्टी मित्रमंडळ, प्रबुद्ध मित्रमंडळ, इंदिरानगर - कॅनॉलरोड मित्रमंडळ, आतषबाजी मित्रमंडळ असे एकूण ३५ चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीतील प्रबोधनात्मक देखावे आकर्षण ठरले होते. ढोल-ताशांसह आकर्षक विद्युत रोषणाईचे डीजेने मिरवणुकीत रंगत आणली.मिरवणुकीत तोबा गर्दीसर्व चित्ररथ बिटको चौकात मुख्य मिरवणुकीत सहभागी होत असल्याने बिटकोपासून शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळ्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा तोबा गर्दी झाल्याने पाय ठेवण्याससुद्धा जागा नव्हती. मिरवणूक मार्गावर विविध पक्ष संस्था, मंडळांच्या वतीने चित्ररथ व आंबेडकरप्रेमींचे स्वागत करण्यात येत होते.