शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अडीचशे कर्मचारी होणार उपोषणात सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:54 IST

कामगार संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्या रद्द करण्याचे आदेश दिले असले तरी मुंबईतील आझाद मैदानावर होणाºया संघटनेच्या उपोषणात नाशिक जिल्ह्यातील सुमारे अडीचशे कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या कर्मचाºयांची साप्ताहिक सुटी आहे असे राज्यभरातील कर्मचारी या उपोषणाला उपस्थित राहणार असल्याचे समजते.

नाशिक : कामगार संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्या रद्द करण्याचे आदेश दिले असले तरी मुंबईतील आझाद मैदानावर होणाºया संघटनेच्या उपोषणात नाशिक जिल्ह्यातील सुमारे अडीचशे कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या कर्मचाºयांची साप्ताहिक सुटी आहे असे राज्यभरातील कर्मचारी या उपोषणाला उपस्थित राहणार असल्याचे समजते.वेतनवाढीच्या प्रमुख मागणीबरोबरच अनेक प्रलंबित प्रश्नांकडे एसटी महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी एसटी कामगार संघटनेने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. यापूर्वी संघटनेने गेल्या ८ व ९ जून रोजी कामबंद आंदोलन पुकारल्याने एसटीची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती.ऐन दिवाळीतील आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक झाल्याने प्रशासनाने या आंदोलनातील कर्मचाºयांवर कारवाईदेखील केली होती. प्रशासनाने केलेल्या एकतर्फी वेतनवाढीला संघटनेने हरकत घेत काही सुधारणा सुचविल्या होत्या. मात्र त्यावर महामंडळाकडून अद्यापही तोडगा काढला जात नसल्याने संघटनेने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे.बुधवार, दि. ३० रोजी आझाद मैदान, मुंबई येथे संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येणार असून, या उपोषणासाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी सहभागी होणार आहेत. कामगार संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये वेतनवाढीच्या मुद्द्यावरून पेच निर्माण झालेला आहे. या संदर्भात औद्योगिक न्यायालयाने तोडगा काढण्याचे आदेश देऊनही प्रशासन चर्चा करीत नसल्याने वेतनवाढीबाबत अद्यापही समाधानकारक तोडगा निघू शकलेला नाही. संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी याप्रकरणी प्रशासनाच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त करून कर्मचाºयांच्या हितासाठी आंदोलनात्मक भूमिका घेतल्याचे म्हटले आहे.याचाच एक भाग म्हणजे बुधवार, दि. ३० रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे कर्मचारी उपोषणास बसणार असून, वेतन कराराबरोबरच इतर अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधणार आहे. या उपोषणाची प्रशासनाने दखल न घेतल्यस दि. १ नोव्हेंबरपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विभागीय कार्यालयांसमोर कर्मचारी उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.कामगारांच्या सुट्या रद्दकर्मचाºयांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी एसटी महामंडळ प्रशासनाने कामगारांच्या सुट्या रद्द केल्याचे बालले जात आहे. मुंबईतील उपोषणास गर्दी होऊ नये तसेच कर्मचारी अन्य आंदोलनात सहभागी होऊ नये यासाठी अशाप्रकारचे पत्रक काढल्याची चर्चा आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने कर्मचाºयांनी सुट्या घेऊ नये असे पत्रक प्रशासनाने काढल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाºयांनी तीव्र नाराजी दर्शविली. असे असले तरी मुंबईतील आंदोलनास राज्यातील कर्मचारी सहभागी होणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळStrikeसंप