कळवण : ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्याच्या ग्रामसेवक युनियनच्या आदेशान्वये कळवण तालुक्यातील कंत्राटी ग्रामसेवक वगळता सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी १ जुलैपासून कामबंद आंदोलन सुरु केले असून, या आंदोलनात कळवण तालुक्यातील ७२ ग्रामसेवक सहभागी असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग खिल्लारी, सरचिटणीस विजय देवरे, संघटनेचे नेते ग्रामविकास अधिकारी एस. व्ही. पवार यांनी दिली. ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी यांची वेतन त्रुटी दूर करणे, रोजगार हमी योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे, २० ग्रामपंचायतींमागे एक ग्रामविस्तार अधिकारी पद निर्माण करावे, आदर्श ग्रामसेवकांना २ आगाऊ वेतनवाढी लागू कराव्यात, प्रवासभत्ता ११०० रु पयांवरून ३००० रुपये करावा आदि मागण्या असून, याबाबतीत वेळोवेळी पाठपुरावा करूनही ग्रामविकास मंत्रालयाने दखल न घेतल्याने बेमुदत संप केला असल्याचे पवार यांनी सांगितले. सध्या शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठी लागणारे सर्व माहिती संप सुरु करण्याअगोदर देऊन दाखल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. संपाच्या काळात कुणाचीही अडवणूक करण्याचा ग्रामसेवकांचा प्रयत्न नसून शासन दरबारी असलेल्या मागण्या मान्य होनेसाठीचा प्रयत्न असल्याचे पवार यांनी सांगितले.
कळवणमधील ७२ ग्रामसेवक संपात सहभागी
By admin | Updated: July 7, 2014 00:20 IST