ओझर : जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी,इगतपुरी, व चांदवड तालुक्यातील ८७ द्राक्ष उत्पादक शेतक-यांची ओझरच्या आदित्य अॅग्रो एक्स्पोर्टने जवळपास २ कोटी ९१ लाख रु पयांची फसवणूक केल्याने फरार असलेल्या संतोष बबन गवळी या व्यापा-याच्या घरावर शेतक-यांनी मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले.जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी,इगतपुरी, व चांदवड तालुक्यातील ८७ द्राक्ष उत्पादक शेतक-यांनी ओझर येथील आदित्य अॅग्रो एक्स्पोर्टचे व्यापारी संतोष बबन गवळी तसेच निलेश बाळासाहेब दवांगे,पंकज माधव मोहन आदी व्यापा-यांना द्राक्षमाल निर्यातीसाठी दिला होता. मात्र, चार तालुक्यातील ८७ शेतक-यांना खोटे धनादेश देत जवळपास २ कोटी ९१ लाख रु पयांची फसवणूक करत रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केल्याने शेतक-यांनी ओझर येथील मुख्य व्यापारी सतोष बबन गवळी यांच्या घरासमोर घरूनच भाकरी बांधून आणत ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत हा ठिय्या शांततेच्या मार्गाने सुरू राहणार असल्याचा पवित्रा शेतक-यांनी घेतला आहे.शेतक-यांच्या फसवणूकप्रकरणी पोलीस अधीक्षक आरती सिंग, निफाडचे आमदार अनिल कदम यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. तर याबत ओझर पोलीस स्टेशनमध्ये सबंधित व्यापा-यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.आंदोलनात विनोद पाटील, नंदू मते, आनंद गायकवाड, अनिल जाधव, रोहित जाधव, बाळासाहेब गायकवाड, रमेश खैरे, राजाराम परदेशी, रमेश कुयटे, सत्यजित भालेराव, भगवंत धुमाळ, बाळासाहेब राजगुरू, अनिल कोठुळे आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
फरार द्राक्ष व्यापाऱ्याच्या घरासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 17:40 IST
तीन कोटींची फसवणूक : रक्कम मिळेपर्यंत आंदोलन
फरार द्राक्ष व्यापाऱ्याच्या घरासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या
ठळक मुद्देओझर पोलीस स्टेशनमध्ये सबंधित व्यापा-यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.