शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

खासदार संसदेत जाणारा हवा की जेलमध्ये? : आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 01:42 IST

नाशिक : जनतेला खासदार संसदेत जाणारा हवा की जेलमध्ये, असे म्हणत जेलमध्ये लोकांसाठी नव्हे तर मनीलॉँड्रिंगसारख्या देशद्रोहसदृश कामासाठी जाणाऱ्यांना ...

नाशिक : जनतेला खासदार संसदेत जाणारा हवा की जेलमध्ये, असे म्हणत जेलमध्ये लोकांसाठी नव्हे तर मनीलॉँड्रिंगसारख्या देशद्रोहसदृश कामासाठी जाणाऱ्यांना संधी द्याल काय, असा थेट प्रश्न शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.शिवसेना-भाजप युतीची प्रचारसभा सिडकोतील पवननगर येथील नानासाहेब उत्तमराव पाटील मैदानावर सोमवारी (दि.२५) सायंकाळी झाली. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील तसेच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार सीमा हिरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.देशात आणि राज्यात कॉँग्रेस राष्टÑवादीची सत्ता असताना त्यांनी अनेक घोटाळे केले. सिंचन घोटाळे केल्यानेच दुष्काळ फोफावला. राज्यात तर कॉँग्रेस भ्रष्टवादी नेत्यांची कामे निस्तारण्यातच सरकारची पाच वर्षे गेली असे सांगून आदित्य ठाकरे यांनी त्यांनी घोटाळे केले म्हणून ते जेलमध्ये जाऊन आले आणि आताही तेच मत मागत आहेत. तेव्हा अशांना मतदान देणार का, असा प्रश्न केला. गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होती, परंतु विधानसभेत ती राहिली नाही. त्यावर आता अनेकजण साडेचार वर्षे भांडले, आता सत्तेसाठी एकत्र आल्याची टीका करीत आहेत. मात्र, जेव्हा देशाचा विषय येतो तेव्हा सत्तेचा विषय बाजूला पडतो. आता युती कधीच तुटणार नाही, असेही त्यांनी सांगितले.यावेळी गुलाबराव पाटील यांनीदेखील साडेचार वर्षे भांडूनही भाजप-सेनेने सतराशेसाठ पक्षांच्या आघाड्या केल्या नाहीत. हिंदुत्वाच्या भरवशावरील युती कायम असल्याचे सांगून त्यांनीही महाआघाडीवर टीका केली. आमदार सीमा हिरे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.कोकाटेंवर टीकाआपल्यासारख्या पानटपरीवाल्यांना शिवसेनेने मोठे केले आहे. त्यामुळे आमची आजची पिढी शिवसेनेबरोबरच आहे आणि नातूदेखील शिवसेनेबरोबरच राहतील, असे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगून शिवसेनेच्या नावावर आमदार झालेल्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये, अशी टीका कोकाटे यांचा नामोल्लेख न करता केली.नेते तेथेच, उमेदवार गायबशिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा सुरू असताना भाषण करून उमेदवारच गायब झाले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना उमेदवाराचा उल्लेख करून विधान करताना अडचण निर्माण झाली. त्यांनी उमेदवार पुढे गेले आहेत, असे सांगून सावरून घेतले. व्यासपीठावर सर्वच सिडकोतील सर्व नगरसेवक तसेच शहरातील पदाधिकारी यांची इतकी गर्दी झाली होती की नियोजन विस्कळीत झाले. अनेक नेत्यांना व्यासपीठावर सभा होईपर्यंत उभे राहावे लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिकAditya Thackreyआदित्य ठाकरे