शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंग धोरणामुळे वाढणार गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 01:17 IST

राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यासाठी एकीकृत वाहनतळ धोरण ठरविण्यासंदर्भात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली कार्यवाही संपली असून, यासंदर्भातील अहवाल समितीने शासनाला सादर केला आहे.

नाशिक : राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यासाठी एकीकृत वाहनतळ धोरण ठरविण्यासंदर्भात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली कार्यवाही संपली असून, यासंदर्भातील अहवाल समितीने शासनाला सादर केला आहे. दरम्यान, एकीकडे हे धोरण आणि दुसरीकडे शासनाने मार्च महिन्यात सर्व शहरासाठी समान बांधकाम नियमावली तयार केली असून, त्यातदेखील वाहनतळाचे वेगळे नियम आहेत. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वाहनतळांचे आणि इमारत बांधताना वाहनतळासाठी जागा सोडण्याचे वेगवेगळे नियम आहेत. नाशिक शहरासाठी २०१७ मध्ये शहर विकास आराखडा भागश: मंजूर करताना बांधकाम नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली तयार करण्यात आली. त्यात नाशिक शहरापुरते वाहनतळाचे नियम वेगळे अत्यंत जाचक आहेत. मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत नाशिकला सर्वाधिक वाहनतळासाठी जागा सोडावी लागत आहे. त्यातच मेकॅनिकल पार्किंग हे अनुज्ञेयच केलेले नाही. त्यामुळे बांधकाम करण्यात अडचणी असून, जवळपास सर्व विकासच ठप्प झाला आहे. नियमावलीत वाहनतळाची जाचक अट शिथिल करावी यासाठी बांधकाम व्यावसायिकांच्या संघटना प्रयत्न करीत आहेत.दरम्यान, राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी नवीन वाहनतळ धोरण आखण्याचे ठरविले. त्यानुसार सर्व महापालिकांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भातील कार्यवाही अंतिम टप्प्यात असतानाच केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्य शासनाने राज्यातील सर्व शहरांसाठी समान बांधकाम नियमावली तयार करण्याचे काम डिसेंबर महिन्यात हाती घेतले. अत्यंत घाईघाईत यासंदर्भातील मसुदा तयार करण्याचे काम करण्यात आले आणिशासनाने वाहनतळ धोरण ठरविण्याची कार्यवाही अगोदरच सुरू केली होती. त्यात ए, बी, सी आणि डी अशी वर्गवारी करण्यात आली असून, नाशिक शहराच्या लोकसंख्येचा विचार करता सी गटात समावेश होता. त्यात सध्या नाशिकमध्ये लागू असलेल्या बांधकाम नियमावलीतील वाहनतळाच्या तरतुदींच्या तुलनेत चांगले नियम आहेत. त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळू शकतो. राज्य शासनाने समान बांधकाम नियमावली तयार केली असली तरी वाहनतळाचे स्वंतत्र धोरण तयार केल्यास ते या नियमावलीला श्रेष्ठ ठरू शकेल आणि तेच अमलात येईल.- अविनाश शिरोडे, बांधकाम तज्ज्ञ

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाParkingपार्किंग