शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

भरकटलेल्या बालकांना मिळाले पालक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:33 IST

अभ्यासाचा कंटाळा व पालकांचे दडपण यामुळे रागाच्या भरात घर सोडलेल्या पाच अल्पवयीन बालकांना मनमाड रेसुब कर्मचाºयांच्या सतर्कतेमुळे आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

मनमाड : अभ्यासाचा कंटाळा व पालकांचे दडपण यामुळे रागाच्या भरात घर सोडलेल्या पाच अल्पवयीन बालकांना मनमाड रेसुब कर्मचाºयांच्या सतर्कतेमुळे आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.  रेसुब कर्मचारी राकेश कुमार व एस. ए. वाणी हे फलाट क्रमांक ५ व ६ वर रात्रीची गस्त घालत असताना फलाटावर भेदरलेल्या अवस्थेत तीन अल्पवयीन मुली त्यांच्या निदर्शनास आल्या. कर्मचाºयांना संशय आल्याने त्यांनी या मुलींची चौकशी केली व रेसुब कार्यालयात आणले. रेसुब निरीक्षक के. डी. मोरे यांनी या मुलींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्या खंडवा येथील रहिवासी असल्याचे समजले. अभ्यासाचा कंटाळा यामुळे रागाच्या भरात घर सोडले असल्याचे त्यांनी सांगितले. आशू आनंद मिलिंद (१०), खुशी आनंद मिलिंद(९) पूजा प्रताप ठाकूर (१४) सर्व, रा. सुरेंद्रनगर, चिरागधन (खंडवा) असे या मुलींची नावे आहेत. रेसुब कर्मचाºयांनी तत्काळ खंडवा येथील कर्मचाºयांशी संपर्क साधला. पालकांनी पोलीस ठाण्यात मुली हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार खंडवा लोहमार्ग पोलिसांनी पालकांना सदर बातमी दिली. खंडवा पोलिसांच्या उपस्थितीत या मुलींना सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले.  दुसºया घटनेत रेसुब कर्मचारी राकेश कुमार हे फलाट क्रमांक १ वर गस्त घालत असताना एक शाळकरी मुलगा भेदरलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला रेसुब कार्यालयात आणून चौकशी केली असता सत्यम लालजी सरोज (१२), रा. मान खुर्द मुंबई असे त्याचे नाव असल्याचे समजले. रागाच्या भरात घर सोडल्याचे त्याने सांगितले. तसेच फलाट क्र. ५ वर नागेश शिवप्रसाद मुगनोरे, रा. मडकाती, जि. बालकी (कर्नाटक)हा मुलगा घराचा पत्ता विसरला म्हणून मिळून आला. मनमाड येथे पोलिसांनी या बालकांना पालकांच्या ताब्यात दिले. मनमाड रेल्वेस्थानकावर संशयास्पद अल्पवयीन मुले आढळून आल्यास रेसुब कर्मचाºयांकडून सखोल चौकशी करण्यात येते. यातूनच रागाच्या भरात घर सोडलेल्या पाच अल्पवयीन बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करता आले आहे.- के. डी. मोरे,  रेसुब निरीक्षक, मनमाड

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीPoliceपोलिस