शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या फी वाढीविरुद्ध पालक संघ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:18 IST

मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विविध समस्यांसह संस्थाचालकांनी केलेल्या भरमसाठ फी वाढीविरोधात शालेय पालक संघाने शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

ठळक मुद्देसोयी-सुविधांचा अभाव, आंदोलनाचा इशारा; संस्थाचालकांनीही मांडली आपली बाजू

सातपूर : येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विविध समस्यांसह संस्थाचालकांनी केलेल्या भरमसाठ फी वाढीविरोधात शालेय पालक संघाने शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. आठ दिवसांच्या आत समस्या न सुटल्यास शाळा बंद आंदोलन छेडण्याचा इशारा पालक संघाने निवेदनाद्वारे दिला आहे.अशोकनगर राज्य कर्मचारी वसाहतीत मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक, माध्यमिक व इंग्लिश मीडियम स्कूल आहे. याठिकाणी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून शाळेला विविध समस्यांनी घेरले आहे. शालेय परिसरात पिण्याचे स्वच्छ पाणी नसून, संडास बाथरूमची चांगली सुविधा नाही, बेंचेस, ग्रंथालय, प्रयोगशाळा, वाचनालय, लाइट, फॅन आदी भौतिक सुविधा नाहीत. पावसाळ्यात तर शालेय परिसर अक्षरश: पाण्यात असतो. पाण्याचे डबके साचून विद्यार्थांना त्यातून ये-जा करावी लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबत संस्थाचालकांना लेखी निवेदन देऊनही कार्यवाही झालेली नाही. याउलट पालकांना नेहमी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. पूर्वी इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सकाळ सत्रात भरवले जात होते. मात्र सद्यस्थितीत इयत्ता पहिली ते पाचवी सकाळी तर सहावी व सातवीचे वर्ग दुपारी भरवले जातात. शाळेकडे स्वत:ची इमारत असताना दोन टप्प्यात वर्ग भरवून विद्यार्थी व पालकांची गैरसोय केली जात असल्याचा आरोप पालकांंनी केला आहे.दरम्यान, संस्था अनुदानित असताना संस्थेने फीमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. प्राथमिक विभागाची फी ९१० रुपयांवरून १८००, तर माध्यमिक विभागाची फी १२१० रुपयांवरून २००० रुपये एवढी केली आहे. या परिसरातील विद्यार्थी कामगार वर्गातील असून, ही फीमधील भरमसाठ वाढ पालकांचे कंबरडे मोडणारी आहे. त्यामुळे शाळेतील समस्या व भरमसाठ फी वाढ रद्द न झाल्यास शाळा बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रशांत धिवरे, सहसचिव रमाकांत कुलकर्णी, वसंत शिरसाठ, नारायण पवार, विजय दुसाने, पंकज गुजर, विठ्ठल मुळे आदींसह पालकांनी शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा