शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पालकांची फसवणूक : 'स्कॉलरशीप'चे आमीष; पावणे तीन लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 16:14 IST

शहरातील काही पालकांशी फोनवरुन संपर्क साधून सर्व शिक्षण सोल्युशन एल. एल. पी. या कंपनीच्या माध्यमातून मुलांचा अभ्यासक्रम व स्कॉलरशिप मंजुरीचे आमीष दाखवले.

ठळक मुद्देऑनलाइन व्यवहारास केले प्रवृत्त

नाशिक : एका कंपनीच्या माध्यमातून मुलांचा अभ्यासक्रम व स्कॉलरशिप मंजुर करुन देण्याचे आमीष दाखवून लबाडांनी शहरातील पालकांना सुमारे पावने तीन लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रवींद्र श्रीकृष्ण पांडे (३९, रा. उत्तमनगर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार भामट्यांनी जानेवारी २०२० पासून त्यांच्यासह शहरातील इतर पालकांना गंडा घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरु झाले आहे. त्यामुळे पाल्यांच्या शिक्षणाबाबत पालक सतर्क झाले आहेत. दरम्यान, भामट्यांनी शहरातील काही पालकांशी फोनवरुन संपर्क साधून सर्व शिक्षण सोल्युशन एल. एल. पी. या कंपनीच्या माध्यमातून मुलांचा अभ्यासक्रम व स्कॉलरशिप मंजुरीचे आमीष दाखवले. तसेच याचा लाभ घेण्यासाठी प्रोसेसिंग फीच्या नावाखाली पालकांना ऑनलाइन पद्धतीने पैसे भरण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार पालकांनी लिंकवर सांगितल्यानुसार पैसे भरले. मात्र त्यानंतर भामट्यांनी संपर्क तोडल्याने फसवणूक झाल्याचे अनेकांच्या लक्षात आले. त्यामुळे अनेकांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारी दिल्या. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात मोबाइलवरुन संपर्क साधणारे भामटे तसेच ज्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयfraudधोकेबाजीScholarshipशिष्यवृत्तीcyber crimeसायबर क्राइम