शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू करण्यासाठी टाकेद विद्यालयात पालक सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 20:45 IST

सर्वतिर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल टाकेद येथील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यासाठी परीसरातील पालकांची सभा विद्यालयात सकाळी अकरा वाजता उपसरपंच रामचंद्र परदेशी, रतन बांबळे, चिंधू नांगरे, प्राचार्य तुकाराम साबळे, उपप्राचार्य रमापती चौहान यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.

ठळक मुद्देबुधवारी ( दि.२७) पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत.

सर्वतिर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल टाकेद येथील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यासाठी परीसरातील पालकांची सभा विद्यालयात सकाळी अकरा वाजता उपसरपंच रामचंद्र परदेशी, रतन बांबळे, चिंधू नांगरे, प्राचार्य तुकाराम साबळे, उपप्राचार्य रमापती चौहान यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.शासनाच्या आदेशान्वये बुधवारी ( दि.२७) पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत. यासाठी पुर्व तयारी म्हणून आयोजित केलेल्या सभेसाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्राचार्य तुकाराम साबळे यांनी मुलांना शाळेत पाठवताना मास्क, सॅनिटायझर बाटली, पाण्याची बाटली घरून घेऊन येणे बाबत सुचना करण्यात आल्या. शाळा सुरू होण्या अगोदर पालक व विद्यार्थी यांनी हमीपत्र लिहून देणे बंधनकारक असल्याचे व हमीपत्राशिवाय शाळेत प्रवेश मिळणार नाही असेही सांगण्यात आले.सद्या नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु आहेत. एका बेंचवर एक विद्यार्थी या प्रमाणे बैठक व्यवस्था असून प्रत्येक विद्यार्थी एक दिवसाआड शाळेत येत आहेत व शिक्षण घेत आहेत. या वेळी गेटवरच प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान वऑक्सीमिटरने ऑक्सिजन लेवलची तपासणी केली जाते. याच प्रमाणे पांचवीं ते आठवी च्या मुलांचीही काळजी घेतली जाणार आहे रविवारी व सोमवारी ग्रामपंचायत च्या सहकार्याने सर्व वर्ग खोल्या व परीसराचे निर्जंतुकिकरण केले जाणार आहे. यासाठी सरपंच ताराबाई बांबळे व उपसरपंच रामचंद्र परदेशी यांनी सहकार्य करण्याचे कबुल केले.यासभेवेळी वेणूबाई गवारी, ज्योती गायकवाड, आश्विनी आगलावे, बाळू बांबळे, बाळू केवारे, तुकाराम साबळे, पोटे, विलास खापरे, राजेंद्र गायकवाड, संजय धादवड, मनोज चव्हाण, गोरखनाथ जोशी, राजाराम कोळी, राजेंद्र राठोड, किरण चौरे, निलेश माकोणे, उल्हास वराडे आदी उपस्थित होते.(२४ टाकेद)पालक सभेवेळी मार्गदर्शन करताना रामचंद्र परदेशी, रतन बांबळे, तुकाराम साबळे, रमापती चौहान, चिंधू नांगरे.

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळा