शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

औंदाणे परिसरात बिबट्याची दहशत

By admin | Updated: July 9, 2014 01:42 IST

औंदाणे परिसरात बिबट्याची दहशत

 

तरसाळी : कौतिकपाडे आणि औंदाणे परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. रात्री साडेआठ वाजता दोन शेतकऱ्यांच्या शेतात हा बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण असून, शेतकरी शेतातील व गावातील कामे लवकर उरकून सायंकाळी सातच्या आत घरात जात आहेत. वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.कौतिकपाडे येथील शेतकरी बाळू पवार व औंदाणे येथील प्रकाश निकम घरामध्ये असताना अचानक कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आल्याने या शेतकऱ्यांनी बॅटरी लावून पाहिले तर बिबट्या घरासमोरील डाळींबबागेत बसलेला दिसला. हा बिबट्या साधारणत: अंदाजे आठ वर्षांचा असावा. या शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्यामुळे शेजारील शेतकरी जमा झाले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून ही माहिती देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी फटाक्यांचा आवाज केल्याने हा बिबट्या तिथून निघून पोल्ट्री फार्मच्या मागे लपला असता सुतळी बॉम्ब फोडले. त्यानंतर त्याने पलायन केले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतातील या बिबट्याचे पायाचे ठसे घेतले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांकडे पिंजरा लावण्याची मागणी केली.कौतिकपाडे व औंदाणे गावाजवळ कपाळ्या डोंगर व जंगल आहे. या कपाळ्या डोंगरावरील जंगलाला काही दिवसांपूर्वी आग लागून हे जंगल जाळले होते. त्यामुळे जंगलात अन्न-पाणी नसल्याने हे बिबटे अन्न व पाण्याच्या शोधात रात्रीच्या वेळेस मनुष्यवस्तीत येऊ लागल्याने या परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)