लोकमत न्युज नेटवर्कवटार : येथील सावतावाडी परिसरात गेल्या एक महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असुन दररोज शेतकऱ्यांच्या जनावरांचा फडश्या पाडत आहे. बुधवारी (दि.१२) मध्यरात्री विंचुरे शिवारातील रविंद्र जाधव यांच्या दोन शेळ्या ठार केल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. दररोज सायंकाळच्या सुमारास बिबट्या दर्शन देतो. त्यामुळे पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुधाची जनावरे मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी धास्तावला आहे.गेल्या सहा महिन्यात सहा ते सात वेळा हल्ले करून २०-२५ मुक्या प्राण्यांचा बळी गेला. एक महिन्यापासुन वनविभागाने लावलेला पिंजरा काहीच उपयोगात आलेला नाही. गेल्या अनेक दिवसापूर्वी सावतावाड शिवरात बिबट्याचा वावर आहे. सावतावाडी परिसरात बिबट्याचा बºयाच दिवसापासून वावर असून शेतकºयांना दिसत आहे. दरववर्षी पाण्याचा शोधात येथे बिबट्या येतात. पाळीव प्राणी फस्त करतआहे. यापरीसरात लपण्यासाठी मोठी काटेरी जुडपे आहेत. त्याचा फायदा घेत बिबट्याचे वास्तव्य वाढले आहे.येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुग्ध व्यवसायही शेतीला जोडधंदा म्हणून करतो. परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे रात्र जागुन काढत फटाके फोडून पाळीव प्राण्यांचे सौरक्षण करत आहेत.कोट...मध्यरात्रीच्या सुमारास जाग आली तेव्हा पाहतो तर बिबट्याने दोन बकºया मारून खात होता. आरडाओरडा करून बिबट्याला पळवला खरं पण दोन बकºया मृत झाल्या होत्या. बºयाच दिवसांपासून आम्हाला शेतात बिबटे दिसतात, त्यामुळे शेतात जाता येत नाही. सद्या संकटाना तोंड देऊन शेती व्यवस्था सुरळीत ठेवली आहे, त्यात अशी हानी होत राहिली तर आम्ही काय करायचे ? आज माझ्यावर हे संकट आले आहे, उद्या कोणावरही येऊ शकते, त्यासाठी वनविभागने तातडीच्या उपाययोजना कराव्यात.- रविंद्र जाधव, शेतकरी वटार.गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या शेतात बिबट्याचा वावर आहे. दररोज फटाके फोडून शेतात कामे करावी लागत आहेत.गडी माणसे कामाला येत नाहीत. वनविभागाच्या सटाणा कार्यालयाशी संपर्क साधला असता आमची माणसे येऊन बिबट्याला पकडतील असे सांगून आमची समजुत काढत आहेत, त्या दिवसापासून कोणीही फिरून पाहिले नाही.- लक्ष्मीकांत खैरनार,शेतकरी, वटार.
बिबट्याच्या वास्तव्यामुळे घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 16:24 IST
वटार : येथील सावतावाडी परिसरात गेल्या एक महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असुन दररोज शेतकऱ्यांच्या जनावरांचा फडश्या पाडत आहे. बुधवारी (दि.१२) मध्यरात्री विंचुरे शिवारातील रविंद्र जाधव यांच्या दोन शेळ्या ठार केल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. दररोज सायंकाळच्या सुमारास बिबट्या दर्शन देतो. त्यामुळे पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुधाची जनावरे मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी धास्तावला आहे.
बिबट्याच्या वास्तव्यामुळे घबराट
ठळक मुद्देवटार : मध्यरात्री शेतकऱ्याच्या दोन बकºया केल्या फस्त