शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

देवपूरमध्ये ‘पांडुरंगाची’ जलसेवा

By admin | Updated: April 24, 2016 23:35 IST

उपक्रम : प्रत्येक कुटुंबाला मोफत दोनशे लिटर पाणी घरपोच देण्यास प्रारंभ

 देवपूर/पाथरे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील देवपूर येथे पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांची होणारी परवड थांबविण्यासाठी प्रगतिशील शेतकरी पांडुरंग सहादू जगताप यांनी मोफत जलसेवा सुरू केली आहे. जगताप यांनी स्वखर्चाने प्रत्येक कुटुंबास घरपोच दोनशे लिटर पाणी देण्यास प्रारंभ केला आहे. सलग पाच वर्षांत देवपूर परिसरात पुरेसा पाऊस नसल्याने यंदा दुष्काळाची दाहकता वाढली आहे. परिसरातील विहिरी कोरड्याठाक पडल्या असून, शासनाच्या वतीने पाच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तथापि, तो गावासाठी अपुरा पडत असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली असून, ५० रुपयांत दोनशे लिटर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेऊन पांडुरंग जगताप, मंगला जगताप व संतोष जगताप यांनी ग्रामस्थांना मोफत पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला व लागलीच या उपक्रमास त्यांनी प्रारंभही केला आहे. विहिरीत पाणी असेपर्यंत संपूर्ण गावाला मोफत पाणीपुरवठा करण्याचा निर्धार जगताप यांनी यावेळी व्यक्त केला. याबद्दल देवपूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सुनील गडाख यांच्या हस्ते जगताप यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरपंच मदन गोळेसर, उपसरपंच सुनीता कळंबे, तुषार गडाख, संजय गडाख, शरद गडाख, विकास गडाख, दौलत खोले, म्हाळू खोले, सुकदेव गडाख, बाळासाहेब गडाख, सुनील रानडे, चंद्रभान गडाख आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)