शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पंडितनगर भाजीमार्केट ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:24 IST

सिडको प्रशासनाच्या वतीने रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना पंडितनगर येथे हक्काची जागा उपलब्ध करून दिली असली तरी येथील अर्धवट कामांमुळे अद्यापही बाजार थाटला जात नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

सिडको : सिडको प्रशासनाच्या वतीने रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना पंडितनगर येथे हक्काची जागा उपलब्ध करून दिली असली तरी येथील अर्धवट कामांमुळे अद्यापही बाजार थाटला जात नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. बाजाराच्या आतील रस्ते झालेले नसून पथदीपही बंद आहे. याबरोबच वाढलेल्या गाजरगवतामुळे परिसराला बकालस्वरूप प्राप्त झाले आहे. महापालिकेने येथे मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे.सिडको पंडितनगर येथील संत गाडगे महाराज भाजी मार्केट व शॉपिंग सेंटरची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, भाजीमार्केट गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असून, याठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला आहे. महापालिकेच्या वतीने सिडको भागात भाजीपाला व फळविक्रेत्यांसाठी हॉकर्स झोन बनविले असले तरी अजूनही अनेक भागांतील मुख्य चौक तसेच रस्त्यांवर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. पंडितनगर येथे भाजीपाला विक्रेत्यांसाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी याठिकाणी मनपाच्या वतीने मूलभूत सुविधा दिल्या जात नसल्याने भाजीपाला विक्रेते व्यवसाय करीत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.पथदीपची व्यवस्था करावीपंडितनगर येथे सिडको प्रशासनाच्या वतीने दोनशेहून अधिक विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिली असली तरी केवळ मनपाने याठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याने भाजी मार्केट ओस पडले आहे. मनपाने या ठिकाणचे अंतर्गत रस्ते तयार करून द्यावे पथदीपांची व्यवस्था करून द्यावी तसेच वाढलेले गाजरगवत हटवावे यांसह मार्केटमध्ये मूलभूत सुविधा देण्याची अपेक्षा भाजीपाला विक्रेत्यांनी केली आहे.रस्त्यावर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाºया विक्रेत्यांना पंडितनगर येथे हक्काची जागा मिळाली आहे. परंतु मनपाच्या वतीने याठिकाणी मूलभूत सुविधा पुरविल्या नसल्याने भाजीमार्केट ओस पडले आहे. गेल्या दहा वर्षांपासून हा प्रश्न सुटलेला नूसन यामुळे विक्रेत्यांना हक्काची जागा मिळूनही व्यवसाय करता येत नाही. मनपाने याठिकाणी मूलभूत सुविधा दिल्यास भाजीबाजार सुरू होण्यास मदत होईल.- विठ्ठल विभुते,अध्यक्ष, संत गाडगे महाराज भाजीमार्केट

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMarketबाजार