शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पाण्डेय यांच्याकडून गुंडांना मोक्का अन‌ 'मौका' २५० गुन्हेगारांना सुधारण्याची शेवटची संधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 21:40 IST

शहरातील विभाग-१मधील ६९, विभाग-२मधील ६४, विभाग-३मधील ५४ आणि विभाग-४मधील ६३ गुन्हेगारांनी गुन्हेगारीच्या मार्गावर आता यापुढे चालणार नसल्याचे लेखी वचन पोलिसांना दिले आहे.

ठळक मुद्दे२५० गुन्हेगारांनी बंधपत्र पोलिसांकडे लिहून दिले गुन्हेगारीचा मार्ग सोडण्याची शेवटची संधी १०८सराईत गुन्हेगारांवर मोक्काचा फास आवळला

नाशिक : शहर व परिसरात वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी एकीकडे मोक्का तर दुसरीकडे 'मौका' अशी समांतर कार्यवाही सध्या सुरु केली आहे. गुन्हेगार सुधार योजनेअंतर्गत पोलिसांनी आतापर्यंत २५० गुन्हेगारांना वर्तणुक सुधारण्याची संधी दिली आहे. तसेच ज्यांनी गुन्हेगारीचा मार्ग सोडण्यास असमर्थता दर्शविली अशा १०८सराईत गुन्हेगारांवर मोक्काचा फास आवळला आहे.पोलीस आयुक्तालयाकडून गुन्हेगार सुधार योजनेअंतर्गत शहरातील दोन्ही परिमंडळातील चारही विभागांच्या १३ पोलीस ठाण्यांमधील सराईत गुन्हेगारांना बोलावून त्यांचे समुपदेशन करत सामान्य नागरिकांप्रमाणे वर्तणूक करुन मुख्य प्रवाहात येण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांना वाट खुली करुन दिली आहे. या योजनेचा लाभ देत सुमारे २५० गुन्हेगारांकडून बंधपत्र घेत त्यांना गुन्हेगारीचा मार्ग सोडण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे.शहरात गेल्या मंगळवारपासून (दि.२२) गुन्हेगार सुधार योजनेअंतर्गत विविध पोलीस ठाण्यांचा एकत्रित उपक्रम घेतला जात आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या तीन गुन्हेगार सुधार मेळाव्यांमध्ये उपस्थित राहिलेल्या गुन्हेगारांपैकी एकुण २५० गुन्हेगारांनी चांगले वर्तन करणार असल्याचे बंधपत्र पोलिसांकडे लिहून दिले आहे. यामध्ये शहरातील विभाग-१मधील ६९, विभाग-२मधील ६४, विभाग-३मधील ५४ आणि विभाग-४मधील ६३ गुन्हेगारांनी गुन्हेगारीच्या मार्गावर आता यापुढे चालणार नसल्याचे लेखी वचन पोलिसांना दिले आहे.'वॉच' ठेवण्यात येईलपोलीस ठाणेनिहाय गुन्हेगारांची यादी तयार आहे. ज्या गुन्हेगारांनी बंधपत्रे लिहून दिली आहेत, त्यांच्याही नावांची यादी संबंधित पोलिस ठाण्याकडे असून वरिष्ठ पोलिस निरिक्षकांकडून ती यादी बीट मार्शलपासून तर गुन्हे शोधपथकापर्यत सर्वांना छायाचित्रांसह उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यानुसार या गुन्हेगारांच्या वर्तणुकीवर पोलीस वॉच ठेवणार आहेत, असे पाण्डेय यांनी सांगितले.---सुधार योजनेतून अनावधानाने वाट चुकलेल्या गुन्हेगारांना सुधारण्याची संधी दिली जात आहे. त्यांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठीदेखील प्रयत्न केले जातील. मात्र जे गुन्हेगार गुन्हेगारी प्रवृत्ती सोडणार नाहीत अशांची कुठलीही गय केली जाणार नाही. त्यांच्या गुन्हेगारीचा पुर्वइतिहास तपासून तडीपार, झोपडपट्टी दादा कायदा (एमपीडीए), मोक्का यासारखी कारवाई करण्यात येईल.- दीपक पाण्डे्य, पोलिस आयुक्त

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी