शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पांडवनगरीत दाम्पत्याला भरदिवसा घरात घुसून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 01:42 IST

पांडवनगरी परिसरात शुक्रवारी (दि.६) भर दिवसा पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवून आठ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.

इंदिरानगर : पांडवनगरी परिसरात शुक्रवारी (दि.६) भर दिवसा पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवून आठ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्याने परीसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित दाम्पत्याने इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस लुटारूंचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना नितीन आहेर (२६, रा अभिमन्यू अपार्टमेंट समोर, पांडवनगरी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. रंजना आहेर शुक्रवारी (दि. ६) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घरातील किचनमागील दरवाजातून मोबाईलवर बोलत असताना घरात येत होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून एक २५ वर्षीय युवक घरात आला. त्याने रंजना आहेर यांचा उजवा हात पाठीमागे धरून ठेवत पैशांची मागणी केली. तसेच सुमारे एक फुटाचा चाकू दाखवून त्याने पैशासाठी दमबाजी करीत पुन्हा पैशाची मागणी केली. यावेळी रंजना आहेर यांचे पती नितीन आहेर तेथे आले, त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे लुटारूने दोघांनाही चाकूचा धाक दाखवून बेडरूममध्ये बसवले. त्यानंतर घरातील कपाटांमधील कपडे बाहेर फेकून त्यातील दोन हजार रुपयांची रोकड व नितीन आहेर यांचा मोबाईल व एक पाचशे रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ८ हजार रुपयांचा ऐवज लुटून घरामागील भिंतीवरून उडी मारून पळ काढला. या प्रकरणी रंजना आहेर यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांंकडून चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी