शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पंचकल्याणक महोत्सवास प्रारंभ

By admin | Updated: February 12, 2016 23:59 IST

मांगीतुंगीत जनसागर : जैन समाजाचा नव्हे तर भारताचा गौरव

नाशिक : सटाणा तालुक्यातील जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे निर्माण करण्यात आलेल्या भगवान वृषभदेवाच्या १०८ फूट उंचीच्या भव्य मूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वतोभद्र महलात पंचकल्याणक उत्सवास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ८८ देवतांना प्रसन्न करण्याबरोबरच त्यांना आवाहन व त्यांचा सन्मान करण्यासाठी अभिषेक, शांती होम, जलहोम, नित्यपूजा, यागमंडल, व नवग्रह होम आदि विधी हस्तिनापूर येथील मुख्य प्रतिष्ठाचार्य विजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व नरेश शास्त्री, सतेंद्र शास्त्री, प्रदीप शास्त्री, भरत काला, सम्मेध उपाध्य आदिंच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. या विधीत हजारो जैन भाविक सहभागी झाले. यादरम्यान आचार्य अनेकान्त सागर, गणिनी प्रमुख ज्ञानमती माताजी यांची प्रवचने झाली.या नेत्रदीपक सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य आपणास लाभले हे जन्मोजन्मीचे पुण्य आहे. असे मत व्यक्त करीत आज झालेल्या धार्मिक विधीचे महत्त्व गणिनी प्रमुख ज्ञानमती माताजी यांनी प्रवचनातून सांगितले. देशभरातील हजारो जैन भाविकांच्या गर्दीने परिसर फुलून गेला आहे.यानिमित्ताने आचार्य अनेकान्त सागर, गणिनी प्रमुख ज्ञानमती माताजी, आचार्य देवनंदी महाराज, आचार्य पद्मनंदी महाराज, आचार्य गुप्त नंदी महाराज, आचार्य बालाचार्य जिनसेन अदिंसह शेकडो जैन साधू-महंतांसह आचार्य, मुनी, माताजी, आर्यिका यांचे आगमन झाले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या भव्य सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून आलेल्या हजारो जैन बांधवांबरोबरच परिसरातील जैनेतर भाविक मोठ्या प्रमाणात मांगीतुंगी येथे हजेरी लावत आहेत. अखंड पाषाणातील भगवान वृषभदेवांची मूर्ती सर्वांसाठी आकर्षण व कुतुहलाचा विषय ठरली आहे.