शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

पंचवटीत धोकादायक वाडे, इमारतींचा धोका कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:43 IST

पावसाळा सुरू होण्याअगोदर महापालिका महिनाभरापूर्वीच धोकादायक इमारती तसेच वाड्यांना नोटिसा देऊन कागदोपत्री आपली कारवाई पूर्ण करते, मात्र संबंधितांनी धोकादायक भाग उतरविला किंवा नाही याची कोणतीही पाहणी करत नाही.

पंचवटी : पावसाळा सुरू होण्याअगोदर महापालिका महिनाभरापूर्वीच धोकादायक इमारती तसेच वाड्यांना नोटिसा देऊन कागदोपत्री आपली कारवाई पूर्ण करते, मात्र संबंधितांनी धोकादायक भाग उतरविला किंवा नाही याची कोणतीही पाहणी करत नाही.ऐन पावसाळ्यात वाडे तसेच धोकादायक इमारतींचा भाग कोसळल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागी होते व धोकादायक वाड्यांचा किंवा इमारतींचा जीर्ण भाग उतरविण्याचे काम करून वराती मागे घोडे याप्रमाणे करत असल्याचे दिसून येत आहे.पंचवटी परिसरात यंदाच्या वर्षी पावसाळ्यात जवळपास तीन इमारतींचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सर्वांत पहिली घटना (दि.५) सुकेणकर लेन येथे घडली. परिसरात ४० ते ४५ वर्षांपूर्वीची जुनी इमारत असलेल्या श्रीराम अपार्टमेंटचा जिना जीर्ण झाल्याने तो कोसळला होता या घटनेत दोनजण जखमी झाले होते, तर दोन ते तीन दिवसांनी मखमलाबाद नाक्यावर असलेल्या हेमकुंजजवळील हर्षवर्धन सोसायटीची तीन मजली इमारत (दि.८) मध्यरात्री कोसळली होती. त्यानंतर रविवारी (दि.२८) दुपारी शनिचौकातील पवार वाड्याची भिंत कोसळून दोघे बहीण-भाऊ जखमी झाले होते. सदर तिन्ही घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. घटनास्थळी धाव घेत त्यांनी वाड्यातील तसेच इमारतीतील रहिवासीयांना तत्काळ घटनास्थळाहून सुरक्षितस्थळी हटवून त्यांची अन्यत्र मनपाच्या इमारतीत राहण्याची व्यवस्था केली होती.दरवर्षी पावसाळ्यात एखाद्या वाडा किंवा धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्यानंतर प्रशासन घटनास्थळी जाऊन उरलेला धोकादायक भाग उतरवून घेण्याची कार्यवाही करते, मात्र हीच तत्परता प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी दाखवून किंवा धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्यानंतर लागलीच कारवाई केली तर जुने वाडे तसेच इमारतींचा भाग पावसाळ्यात कोसळून जखमी होण्याची घटना टाळता तर येईलच शिवाय पावसाळ्यापूर्वी धोकादायक भाग उतरवून घेतला तर पावसाळ्यात पडझड होण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.प्रशासनाची उदासीनताप्रशासन दरवेळी उदासीनता दाखविते पावसाळ्यात केवळ नोटिसा बजावण्याचे काम करत कागदोपत्री आपली जबाबदारी पार पाडते. नोटिसा बजावल्यानंतर त्या धोकादायक वाडे किंवा घरांचा भाग उतरविला किंवा नाही याची कोणतीही पाहणी करत नाही किंवा दखल घेत नाही हे दिसून येते त्यामुळे पावसाळ्यात इमारतीचा भाग कोसळल्यावर प्रशासन वराती मागून घोडे याप्रमाणे धोकादायक भाग उतरविण्याचे काम करते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHomeघर