शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी, राज्यराणीसह तीन रेल्वे गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:40 IST

गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. सोमवारीदेखील मुंबईला जाणाऱ्या पंचवटी, राज्यराणी, मुंबई- भुसावळ पॅसेंजर व इगतपुरी-मनमाड शटल या रेल्वे रद्द करण्यात आल्या तर अप आणि डाउन रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल होत होते.

नाशिकरोड : गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. सोमवारीदेखील मुंबईला जाणाऱ्या पंचवटी, राज्यराणी, मुंबई- भुसावळ पॅसेंजर व इगतपुरी-मनमाड शटल या रेल्वे रद्द करण्यात आल्या तर अप आणि डाउन रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल होत होते.मुंबई-ठाणे परिसरात शनिवार-रविवार झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत होऊन रेल्वे वेळापत्रक कोलमडून गेले होते. मुसळधार पावसामुळे रविवारी मुंबई-नाशिक दरम्यान रेल्वे धावूशकली नाही. कोलमडलेले रेल्वे वेळापत्रक सुधारित करण्यासाठी सोमवारी मनमाडहून मुंबईला जाणारी पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेस, अप-डाउनची मुंबई भुसावळ पॅसेंजर, इगतपुरी-मनमाड शटल रद्द करण्यात आली होती. गोदावरी एक्स्प्रेस ही सोमवारी आपल्या निर्धारित वेळेत मुंबईकडे रवाना झाली.रविवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रद्द करण्यात आलेली गोरखपूर एक्स्प्रेस सोमवारी सकाळी नाशिकरोडहून पुन्हा गोरखपूरला रवाना करण्यात आली. मुंबईहून येणाºया वाराणसी, गीतांजली, तपोवन, हरिद्वार, बरेली, पुष्पक या रेल्वे सोमवारी रद्द करण्यात आल्या होत्या.सोमवारी सकाळी मुंबई-गोरखपूर गोदान एक्स्प्रेस, मुंबई - काजीपेठ एक्स्प्रेस या दोन रेल्वे आपल्या निर्धारित वेळेतच धावल्या.रविवारी मुंबईला जाणाºया पठाणकोट, पवन एक्स्प्रेस, वाराणसी, दुरांतो एक्स्प्रेस दहा ते पंधरा तास उशिराने मुंबईला रवाना झाल्या. कोलमडून गेलेले रेल्वेचे वेळापत्रक सुधारित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. तरी बहुतांश रेल्वे उशिराने धावत असल्याने, काही रेल्वेच्या मार्गात बदल करण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.शहर बसेसवा पूर्ववतमुसळधार पावसामुळे शहरातील पुलांवरून पाणी वाहत असल्याने रविवारी दुपारनंतर बंद करण्यात आलेल्या शहर बसेस दुपारनंतर पुन्हा सुरू करण्यात आल्या. दिवसभर सुरू असलेली संततधार तसेच नदीला आलेल्या पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील बंद करण्यात आलेल्या बसेस सोमवारी दुपारी १२ वाजेनंतर पूर्ववत करण्यात आल्या.४रविवारी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे महामार्गावरील अनेक लहान-मोठ्या पुलांना पाणी लागल्यामुळे तर काही मार्ग खचल्यामुळे पेठ मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. सदर वाहतूक सोमवारी सुरू करण्यात आली.

टॅग्स :Rainपाऊसgodavariगोदावरीcentral railwayमध्य रेल्वे