शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी एक्सप्रेस अडकली; दीड तास उशिरा पोहोचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2022 02:43 IST

मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस गाडी आटगावजवळ सुमारे सव्वा तास अडकून पडल्याने रात्री साडेनऊ वाजता नाशिकरोडला पोहोचणारी गाडी रात्री अकरा वाजता नाशिकरोड स्थानकावर पोहोचली. आटगावजवळ मालगाडीचे इंजिन नादुरुस्त झाल्याने पंचवटी एक्सप्रेससह अन्य गाड्यांनाही विलंब झाल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले. 

ठळक मुद्देमालगाडीमुळे खोळंबा : मुंबईतून निघालेली गाडी आटगावला थांबली

नाशिक : मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस गाडी आटगावजवळ सुमारे सव्वा तास अडकून पडल्याने रात्री साडेनऊ वाजता नाशिकरोडला पोहोचणारी गाडी रात्री अकरा वाजता नाशिकरोड स्थानकावर पोहोचली. आटगावजवळ मालगाडीचे इंजिन नादुरुस्त झाल्याने पंचवटी एक्सप्रेससह अन्य गाड्यांनाही विलंब झाल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले. सोमवारी सायंकाळी ६.१५ वाजता मुंबईहून आपल्या निर्धारित वेळेत निघालेली पंचवटी एक्सप्रेस ७.४५ वा. आटगावजवळ येताच मार्गावरच गाडीला रेड सिग्नल मिळाला. या मार्गावर पुढे मालगाडीचे इंजिन नादुरुस्त झाल्याने पंचवटी एक्सप्रेसला थांबविण्यात आले. सुमारे सव्वा ते दीड तास गाडी या मार्गावरच अडकून पडल्याने गाडीला विलंब झाला. मालगाडीसाठी पर्यायी इंजिन उपलब्ध होण्यास बराच वेळ लागणार असल्याने पंचवटी एक्सप्रेसला आऊट लाईनवरून पुढे मार्गस्थ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आऊट लाईनवरील मार्गावरून गाडी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, मालगाडीची लांबी अधिक असल्याने मेनलाईनवर पंचवटी एक्सप्रेसला आणणेही कठीण झाल्याने पुन्हा गाडी थांबविण्यात आली.    अगोदरच विलंब त्यात पुन्हा आऊटलाईनवरूनही गाडी पुढे मार्गस्थ करणे शक्य नसल्याने प्रवाशांमध्ये काहीसा गोंधळ निर्माण झाला. मात्र काही वेळातच मालगाडीचे इंजिन सुरू झाले आणि मालगाडी निघाल्यानंतर त्यानंतर पंचवटी एक्सप्रेसला रवाना करण्यात आले. नियोजित वेळापत्रकानुसार पंचवटी एक्सप्रेस रात्री ९.३६ वाजता नाशिकरोड रेल्वे स्थानकावर येणे अपेक्षित असताना रात्री ११ वाजता गाडी नाशिकरोडला पोओचली.  —इन्फो—इतर गाड्यांनाही विलंबपंचवटी एक्सप्रेसनंतर मुंबईहून धावणाऱ्या इतर रेल्वे गाड्यांचेही वेळापत्रक कोलमडले. जवळपास तासभर गाड्या उशिराने धावत होत्या. रेल्वे प्रशासनाकडूनही तशी सूचना प्रवाशांना देण्यात आली. मुंबईहून येणाऱ्या  राज्यराणी, विदर्भ, पंजाबमेल, यासह इतर  गाड्या उशिराने धावत हेात्या. दरम्यान, पंचवटी एक्सप्रेस गाडीला विलंब झाल्याने दररोज अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. त्यांना दीड दोन तास गाडीतच अडकून पडावे लागले, अशी माहिती पंचवटी रेल्वे प्रवासी संघटनेचे बाळासाहेब केदारे, रेल परिषदेचे सचिव देविदास पंडित यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे