शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी, आडगाव शिवारात दोन फिरस्त्यांचा बुडून मृत्यू

By नामदेव भोर | Updated: May 10, 2023 17:01 IST

मंगळवारी (दि. ९) दुपारी १ वाजेच्या सुमारास गांधी तलावाच्या कडेला रामकुंड येथे निसाळ यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. 

नाशिक : शहरातील गोदावरी नदीपात्रात रामकुंडाजवळील गांधी तलावात एका फिरस्त्याचा मृतदेह आढळून आला असून सावित्रीबाई फुलेनगर , दुर्गानगर भागातील पाटातही एका फिरस्त्याच्या मृतदेह तरंगताना आढळून आल्याने पंचवटी, आडगाव परिसरात या मृत्यूंविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकुंडाजवळील गांधी तलावात बुडून परप्रांतीय फिरस्त्याचा मृत्यू झाला. राजाराम नेपाळ निसाळ(३५,मूळ रा. भागलपूर, राज्य बिहार, सध्या रा. फिरस्ता पंचवटी) असे मृताचे नाव असून मंगळवारी (दि. ९) दुपारी १ वाजेच्या सुमारास गांधी तलावाच्या कडेला रामकुंड येथे निसाळ यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. 

महिला पोलिस शिपाई रोहिणी भाईर व गवळी या रामकुंड, गंगाघाट परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गांधी तलावाजवळील गोल घुमट येथे लोकांची गर्दी दिसल्याने त्यांनी माहिती घेतली. यावेळी निसाळ यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर जीवरक्षकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक चव्हाण करीत आहेत.

पाटात बुडून फिरस्त्याचा मृत्यूआडगाव शिवारातील अमृतधाम परिसरातील सावित्रीबाई फुलेनगर, दुर्गानगर येथील ठोंबरे यांच्या घरासोरील पाटात एका फिरस्त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याची अद्याप ओळख पटलली नाही मात्र , पोलिसांनी मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठविला असून आडगाव पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. पाटाच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नसली तरी त्याचे वय ५० ते ५५ वर्षापर्यंत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिस हवालदार डापसे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक